Friday, September 6, 2024
Home टेलिव्हिजन पायल अरमानला देणार घटस्फोट! म्हणाली, ‘त्याने कृतिकासोबत राहावं, मी मुलांची काळजी घेईन’

पायल अरमानला देणार घटस्फोट! म्हणाली, ‘त्याने कृतिकासोबत राहावं, मी मुलांची काळजी घेईन’

‘बिग बॉस ओटीटी 3’ हा वादविवादाचा शो म्हणून ओळखला जातो. बिग बॅासच्या घरात रोज काहीना काहीतरी नवीन वाद निर्मांण होत असतात. अरमान मलिकने विशालला थप्पड मारली होती. त्यानंतर आताच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अदनान आणि लवकेश कटारिया यांच्यामध्ये खूप भांडण झाली, ज्याच रूपांतर हातापाइ करण्यापर्यंत पोहचलं. त्यातच अरमान आणि कृतीकीचा एक विडीओ सोशल मिडीयावर खूप वायरल होताना दिसतोय. ज्यामूळे ते दोघे खूप ट्रोल होताना दिसतायत. त्यातच अरमानची पहिली पत्नी पायल हिने अरमानला घटस्पोट देणार असल्याच सांगितलं आहे.

‘बिग बॉस ओटीटी 3’मधून बाहेर पडलेल्या पायल हिने आश्चर्यचकीत करणारी घोषणा केली आहे. ती अरमान मलिकपासून वेगळं होण्याच्या विचारात आहे. पायल मलिक आणि कृतिका मलिक या दोघी अरमान मलिक याच्या पत्नी आहेत. हे तिघं फेमस यूटूबर म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी या तिघांनी ‘बिग बॉस ओटीटी 3’च्या घरात प्रवेश केला होता. त्यातून काही दिवसाोपूर्वी पायल बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आणि अरमान आणि कृतिका अजून घरात आहेत. यामूळे पायलला ट्रोलिंग आणि नफरतचा सामना करावा लागत आहे. आणि याचाच असर तिच्या मूलांवर पडताना दिसतोय आणि ती हे सर्व सहन नाही करू शकत.

पायलने एक बॅग तयार केला त्यात ती म्हणाली, “मी या ड्रामामूळे कंटाळले आहे, हे जेव्हा माझ्यापर्यंत होतं तोपर्यंत ठिक होतं आता याचा सामना माझ्या मूलांना करावा लागत आहे. हे खूप लाजिरवाण आहे. पुढे ती, म्हणते याच कारणामूळे मी अरमानपासून वेगल होण्याचा निर्णय घेतला आहे.त्याला कृतिका सोबत राहूदे मी मूलांना घेऊन वेगळ राहिलं.”

ती असही म्हणाली ,”मला हेही महिती आहे गोलू जैद शिवाय नाही राहू शकत ,म्हणून शक्यतो ती त्याला तिच्याबरोबर ठेवेल आणि तिच्या तिनही मूलांना घेऊन निघून जाईल.आम्ही तिघे वेगळे होऊ, दोघं वेगळे होऊ किंवा एक वेगळा होईल असच होऊ शकत.त्यांना या गोष्टीची खबर नाही आहे बाहेर काय होत आहे.एतकी नफरत ट्रोलींग आयूष्यात कधीच नाही मिळाली मला.माझा हा डिसीजन कंफर्म आहे.मी माझ्या मूलांना नाही ऐकू शकत हे सगळं.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

व्हायरल व्हिडिओवरून कंगना आणि सोनू सूदचा वाद; अभिनेत्री म्हणाली, ‘सोनू सूद स्वतःच रामायण दिग्दर्शित करणार’
‘आम्हाला एकमेकांच्या संपर्कात राहायचे नाही’, फहमानची सुंबुलशी मैत्री तुटली का?

हे देखील वाचा