Monday, October 27, 2025
Home टेलिव्हिजन कहरच! उर्फिने शेअर केला लेटेस्ट व्हिडिओ; स्वतःलाच म्हणाली, ‘बेशरम, हास्यास्पद, अश्लील…’

कहरच! उर्फिने शेअर केला लेटेस्ट व्हिडिओ; स्वतःलाच म्हणाली, ‘बेशरम, हास्यास्पद, अश्लील…’

उर्फी जावेद प्रत्येक वेळी आपल्या अतरंगी  फॅशनने लोकांना आश्चर्यचकित करते. काेणत्या गोष्टीतून ते स्वत:साठी ड्रेस बनवेल हे कोणालाच सांगता येत नाही. दररोज ती तिच्या लूकने चाहत्यांना नवनवीन सरप्राईज देते. अशातच उर्फी पुन्हा एकदा तिचा लूक घेऊन आली आहे, जे पाहून तुम्हाला पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसेल. 

उर्फी जावेद (urfi javed) हिने तिचा नवीन व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती पुन्हा एकदा तिच्या अतरंगी फॅशनने लोकांना आश्चर्यचकित करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उर्फी जावेदने तिचे संपूर्ण शरीर काळ्या रंगाच्या पातळ पट्ट्यांनी झाकले आहे. मात्र, तरीदेखील तिचे शरीर स्पष्टच दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती केसांची स्टाइल करताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत उर्फीचे कॅप्शनही चर्चेत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “बेशरम, हास्यास्पद, अश्लील, पण तरीही खूप सुंदर आहे.’ उर्फीच्या या कॅप्शनवरून ती तिच्या ट्रोलर्सना उत्तरे देत असल्याचे स्पष्टपणे समजते.

बिग बॉस ओटीटी आणि स्प्लिट्सविला सारख्या शोमध्ये धमाल करणाऱ्या उर्फी जावेदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया सतत येत आहेत. यावर कमेंट करताना अनेक युजर्स तिचे कौतुक करत आहेत. त्याचबरोबर अनेकजण तिला ट्रोलही करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “खूप प्रयत्न केले, पण काहीच दिसत नव्हते.” एकजण लिहितो, “कयामतचा दिवस खरोखर दूर नाही.” तर दुसरा युजर म्हणताे, “ही आपली संस्कृती नाही.” एका युजरने उर्फीची चक्क मेहनत काढत कमेंट केली आहे. ताे म्हणताे, “एवढी मेहनत अभिनयात लावली असती, तर आज या सगळ्यांची गरज भासली नसती.”

उर्फीचा हा व्हिडिओ साेशल मीडियावर येताच तुफान व्हायरल हाेत आहे. चाहते या व्हिडिओवर भन्नाट कमेंट करत आहेत. (bigg boss ott contestant urfi javed latest bold video goes viral on social media)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
उत्कृष्ट अभिनयाने दशक गाजवणाऱ्या, प्रतिभावान स्मिता पाटील यांच्या 5 अविस्मरणीय भूमिकांना आज देऊयात उजाळा

रश्मिका मंदान्नाचे इंस्टाग्राम अकाउंट झाले हॅक? इंस्टा बायाे पाहून चाहते चिंतेत

हे देखील वाचा