Thursday, June 13, 2024

‘बिग बाॅस’फेम ‘या’ अभिनेत्याची तब्येत बिघडली, गंभीर परिस्थिती केले रुग्णालयात दाखल

बिग बॉस ओटीटी फेम अभिनेता राकेश बापट विषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. राकेश बापटला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अभिनेता ॲडमिट आहे. या विषयी माहिती राकेश बापटने स्वतः सोशल मीडियावर दिली आहे. राकेश बापटने त्याच्या सोशल मीडिया पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्या व्हिडिओमध्ये तो उपचार घेताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये राकेश बापटचा (Rakesh Bapat) चेहरा दिसत नाही आहे, त्याच्या हाताला सलाईन लावली आहे. त्याच बरोबर त्याने इव्हिल आय इमोजीसह थर्मामीटर इमोजी शेयर केली आहे. यावरून असे दिसून येते की, राकेशने चाहत्यांना तब्येतीची अपडेट दिली आहे. राकेशला नक्की काय झाले आहे याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. राकेश लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

राकेशबद्दल बोलायचे झाले तर तो टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता आहे. तो बिग बॉस ओटीटीमध्ये दिसला होता. या शोमध्ये अभिनेत्री शमिता शेट्टीसोबतच्या त्याच्या रोमान्सची बरीच चर्चा झाली होती. शोमधून बाहेर पडल्यानंतरही दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केले. दोघेही एकत्र दिसले होते. राकेश आणि शमिता लग्न करणार आहेत अश्या चर्चा झाल्या होत्या. मात्र, नंतर ते वेगळे झाले. त्यांनी सोशल मीडियावर आपल्या ब्रेकअपची घोषणाही केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raqesh Bapat (@raqeshbapat)

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता तू आशिकी, बिग बॉस 15, बात हमारी पक्की है मध्ये दिसला आहे. कुबूल है, नच बलिए 6 सारख्या शोमध्ये दिसला. त्यांनी चित्रपटांमध्येही काम केले. तुम बिन, दिल विल प्यार व्यार, कुछ दिल ने कहा, कोई मेरे दिल में है, गिप्पी, सरसेनापती हंबीरराव यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला. त्याशिवाय राकेशने ओटीटी स्पेसवरही काम केले आहे. ‘अस्सी नब्बे पूर सौ’ या वेब शोमध्ये तो दिसला होता. (Bigg Boss OTT fame actor Rakesh Bapat admitted to hospital)

अधिक वाचा- 
स्वतःच्या प्रतिमेविषयी शरद पोंक्षें यांच मोठ भाष्य, म्हणाले, ‘मी राडे घालतो…’
सिनेसृष्टीवर शोककळा! वडिलांच्या मृत्यूचे दु:ख सहन न झाल्याने अभिनेत्यानेही 25व्या वर्षी सोडले जग

हे देखील वाचा