Thursday, June 13, 2024

सिनेसृष्टीवर शोककळा! वडिलांच्या मृत्यूचे दु:ख सहन न झाल्याने अभिनेत्यानेही 25व्या वर्षी सोडले जग

हॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेता एंगस क्लाउडचं वयाच्या 25व्या वर्षी निधन झालं आहे. सोमवारी (31 जुलै) निधन झालं आहे. एंगस क्लाउडचंच्या निधनामुळे हॉलिवूड इंडस्ट्रीला व एंगस क्लाउडचंच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेता एंगस क्लाउडची ‘यूफोरिया’ ही सीरिज चांगलीच गाजली. आता अभिनेत्याच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया या ठिकाणी एंगस राहत असून राहत्या घरीच अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला आहे.

वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने अभिनेत्याने प्राण सोडले आहे, असे सांगण्यात आले आहे. त्याच्या मृत्युमुळे त्याचे फॅन दुखावले आहेत. काही दिवसांपूर्वी एंगस क्लाउडच्या (angus cloud)  वडिलांचं निधन झालं होतं. वडिलांच निधन झाले हे एंगसला सहन झालं नाही. एंगस क्लाउडच्या कुटुंबियांना चाहत्यांना माहिती देत सांगितलं आहे की, “एंगस त्याच्या लाडक्या वडिलांना पुन्हा एकदा भेटला आहे. त्याचं त्याच्या वडिलांसोबत खूप घट्ट नातं होतं. एंगसला त्याच्या वडिलांच्या निधनाचा मोठा मानसिक धक्का बसला होता. पण आम्ही सर्व जण त्याच्यासोबत होतो. त्यामुळे त्याने स्वत:ला सावरायला हवं होतं.”

एंगसला ‘यूरोफिया’ वेबसिरीजमधून पहिला ब्रेक मिळाला होता. मिडीया रिपोर्टनुसार, एंगसला न्यूयॉर्कच्या रस्त्यावर त्याच्या मित्रांसह फिरताना जेव्हा कास्टिंग डायरेक्टरने त्याला पाहिले आणि त्याला ‘युरोफिया’साठी कास्ट केले. ही वेबसीरिज चांगलीच गाजली. या सीरिजमधील त्याच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. या सीरिजमुळे तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला.

पहिल्या वेबसिरीजमधून एंगसने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. एंगस क्लाउड नेहमीच ‘यूरोफिया’ या वेबसीरिजमुळे चर्चेत राहिला. तरुण कसे नशेच्या आहारी जातात हे या सीरिजमध्ये दाखवण्यात आले होते. ‘यूरोफिया’ ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्याशिवाय एंगस ‘नॉर्थ हॉलिवूड’ आणि ‘द लाइन’, रेखा, यूनिवर्सल मॉन्स्टर्स या सिनेमातही तो झळकला होता. एंगस सोशल मीडियावर चांगलाच ॲक्टिव्ह होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात होता. (Hollywood actor Angus Cloud has died at the age of 25)

अधिक वाचा- 
काळीज तोडणारी बातमी! शाहरुखच्या सर्वात मोठ्या चाहत्याचे निधन, लगेच वाचा
रुबीना दिलैक प्रेग्नेंट आहे का? नेटकऱ्यांच्या प्रश्नांवर अभिनव शुक्लाची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘ती खरोखर…’

हे देखील वाचा