Friday, August 1, 2025
Home अन्य ‘बिग बॉस ओटीटी’च्या पाच फायनलिस्टच्या भविष्याचा आज होणार निर्णय; जाणून घ्या कुठे आणि कधी पाहाल फिनाले

‘बिग बॉस ओटीटी’च्या पाच फायनलिस्टच्या भविष्याचा आज होणार निर्णय; जाणून घ्या कुठे आणि कधी पाहाल फिनाले

टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून ओळखला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’ होय. याच ‘बिग बॉस ओटीटी’चा शेवट शनिवारी (१८ सप्टेंबर) होणार आहे. सहा आठवड्यांच्या या शोचा विजेता कोण असेल, हे शनिवारी रात्री ठरवले जाईल. टीव्हीचा सर्वात प्रसिद्ध रियॅलिटी शो पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवला जात आहे. हा शो प्रेक्षक २४ तास थेट पाहू शकणार आहेत. बिग बॉस ओटीटीच्या अंतिम फेरीसाठी आता विशेष स्ट्रीमिंग केली जाईल.

शनिवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून प्रेक्षक वूट सिलेक्ट ऍपवर या शोचा शेवट पाहू शकतील. लाईव्ह फिनाले पाहण्यासाठी चाहत्यांनी वूटला सबस्क्राइब करणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे वूटचे सबस्क्रिप्शन नाही ते रविवारी १ सप्टेंबर रोजी वूटवरील सर्व अंतिम भाग पाहू शकतात. ‘बिग बॉस ओटीटी’ ८ ऑगस्टला  सुरू झाला होता.

जाणून घ्या शोच्या विजेत्याला मिळतील किती पैसे
मिळालेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस ओटीटी’च्या विजेत्याला ५५ लाख रुपये दिले जातील. ‘बिग बॉस ओटीटी’ संपल्यानंतर सलमान खान १५ व्या सिझनसह टीव्हीवर परतणार आहे. ‘बिग बॉस १५’चा प्रीमियर ३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता टीव्हीवर होणार आहे. करण जोहर ‘बिग बॉस ओटीटी’ होस्ट करत आहे. शोच्या अंतिम फेरीपर्यंत जाणाऱ्या स्पर्धकांमध्ये दिव्या अग्रवाल, राकेश बापट, शमिता शेट्टी, प्रतीक सहजपाल आणि निशांत भट्ट हे आहेत.

रितेश आणि जिनिलिया फिनालेमध्ये झाले सामील
‘बिग बॉस ओटीटी’ फिनाले करण जोहर होस्ट करणार आहे. हा एपिसोड रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखची एन्ट्री होणार आहे. रितेश आणि जिनिलिया ‘बिग बॉस ओटीटी’ विजेत्याचे नाव सांगतील. माध्यमांतील वृत्तानुसार, रितेश आणि जिनिलिया स्पर्धकांच्या नावांचीही घोषणा करतील, जे ‘बिग बॉस १५’ मध्ये सामील असतील.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राखी सावंतचा AAP नेते राघव चड्ढांना इशारा; म्हणाली, ‘माझ्या नावापासून दूर राहा, नाहीतर त्याचा…’

-‘विश्वातील सर्वात सुंदर मुलगी’, राजेश्वरी खरातच्या ग्लॅमरस अंदाजावर होतोय कौतुकाचा वर्षाव

-स्वतःचं घर विकून डॉ. अमोल कोल्हेंनी केली होती ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेची निर्मिती, वाचा त्यांचा जीवनप्रवास

हे देखील वाचा