Monday, July 1, 2024

शमिता शेट्टी, राकेश बापट आणि उर्फी जावेद एलिमनेशनसाठी झाले नॉमिनेट; कोण होणार बेघर?

बिग बॉस ओटीटी सुरु होऊन एक आठवडा झाला असून, लवकरच बिग बॉस ओटीटीचे पाहिले एलिमनेशन होणार आहे. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या पर्वाच्या पहिल्याच भागात कोण या शोबाहेर पडणार याबद्दल सर्वांमध्ये खूपच उत्सुकता आहे. त्यातच शमिता शेट्टी, राकेश बापट आणि उर्फी जावेद यांना एलिमनेशनसाठी नॉमिनेट केले गेले आहे. तरीही बिग बॉसमध्ये स्पर्धकांना सांगण्यात आले आहे, की, अजूनही नॉमिनेशनची प्रक्रिया संपली नाहीये. अजून काही स्पर्धकांना बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट केले जाणार आहे. बिग बॉसच्या या निर्णयामुळे सर्वच स्पर्धकांना धक्का बसला आहे.

बिग बॉसचे हे पर्व सध्या अतितीव्र चालू असून, अगदी पहिल्याच दिवसापासून या घरात भांडणांना सुरुवात झाली आहे. या शोमध्ये प्रतीक सह्जपाल आणि दिव्या अग्रवाल यांच्यात खूपच मोठे भांडण झाले आहे. प्रतिकने दिव्याचा बॉयफ्रेंड वरुण सूदचे नाव घेत त्याला या शोमध्ये खेचले आहे. यावरूनच त्यांच्यात जास्त भांडण झाले. तर दुसरीकडे शमिता शेट्टी आणि भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग यांच्यातही जोरदार भांडण झाले आहे. सोबतच शमिताने सांगितले की, बिग बॉसमधील स्पर्धक निशांत भट्टने तिच्यासोबत लाईन क्रॉस करण्याचा प्रयत्न देखील केला होता. (bigg boss ott shamita shetty and urfi javed nominated)

बिग बॉसमध्ये सतत चर्चेत राहण्यासाठी स्पर्धक वेगवेगळे हातखंडे वापरताना दिसतात. आपले नाव करण्यासाठी ते कधीकधी त्यांच्या मर्यादा देखील ओलांडतात. बिग बॉसमध्ये आल्यानंतर कलाकारांच्या चेहऱ्यावरील मुखवटा गळून पडत त्यांचे खरे रूप सर्वांसमोर येते.

प्रेक्षकांना बिग बॉस हा शो ओटीटीवर चालू असल्याने २४*७ कधीही बघता येणार आहे. पहिले सहा आठवडे हा शो ओटीटीवर दिसणार असून, पुढे हा शो टीव्हीवर दाखवला जाणार आहे. या शोच्या निमित्ताने करण जोहर पहिल्यांदा बिग बॉसच्या होस्टच्या भूमिकेत दिसणार असून त्याचे यानिमित्ताने ओटीटीवर पदार्पण देखील झाले आहे. मात्र टीव्हीवर हा शो सलमान खानच होस्ट करताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-या वीकेंडलाही ‘सुपर डान्सर’मध्ये शिल्पा शेट्टी गैरहजर; पण जॅकी अन् संगीताची जोडी लावणार ‘चार चाँद’

-आर माधवनसोबत विमानात पहिल्यांदाच घडले ‘असे’ काही; अभिनेत्याचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

-युरोप फिरून ५ महिन्यानंतर मायदेशी परतली परिणीती चोप्रा; म्हणाली, ‘आपल्या घरासारखे…’

हे देखील वाचा