Thursday, March 13, 2025
Home अन्य VIJAY VIKRAM SINGH: नैराश्याचा सामना, दारूचे व्यसन, गंभीर आजार आदी गोष्टींवर मात करत बनले ‘बिग बॉसचा आवाज’

VIJAY VIKRAM SINGH: नैराश्याचा सामना, दारूचे व्यसन, गंभीर आजार आदी गोष्टींवर मात करत बनले ‘बिग बॉसचा आवाज’

बिग बॉस या रियॅलिटी शोला अनेक लोकं नावं ठेवतात मात्र शो न चुकतात बघतात. या शोची मोठी फॅन फॉलोविंग आहे. शो बघताना आपल्याला प्रत्येक वेळेस एक आवाज ऐकू येतो आणि तो म्हणजे, “बिग बॉस चाहते है” हा आवाज ऐकूनच कोणालाही भुरळ घालेल. अतिशय भारदस्त, शुद्ध, आवाज नक्कीच प्रत्येकाला आवडतो. मात्र अनेक वर्ष हा आवाज नक्की कोणाचा? यामागे नक्की कोणती व्यक्ती आहे? असे अनेक प्रश्न प्रत्येक माणसाला पडत असतात. मात्र सोशल मीडियाच्या काळात आता बिग बॉसचा आवाज असणाऱ्या व्यक्तीला अर्थात विजय विक्रम सिंग यांना तर सर्वच ओळखतात. मात्र आज आपण त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेऊया.

आजच्या घडीला मनोरंजन आणि आवाजाच्या जागतिक लोकप्रिय व्हॉइस आर्टिस्ट म्हणून विजय विक्रम सिंग ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या आवाजाने स्वतःची एक इमेज तयार केली. बिग बॉसमुळे त्यांना एक वेगळीच लोकप्रियता आणि प्रसिद्धी प्राप्त झाली. त्यांनी ‘मास्टरशेफ इंडिया’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ या शोमध्ये देखील भाग घेतला होता. मात्र इंडस्ट्रीमध्ये त्यांना बिग बॉसचा आवाज म्हणूनच ओळखले जाते. आज जरी ते लोकप्रिय, यशस्वी कलाकार असले तरी त्यांनी देखील सुरुवातीच्या काळात मोठा संघर्ष केला होता. याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीमध्ये केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Vikram Singh (@vijayvikram77)

मुलाखतीमध्ये विजय विक्रम सिंग यांनी सांगितले की, “सुरुवातीला त्यांना सतत अपयश मिळत गेले त्यामुळे ते व्यसनाधीन झाले होते. सुरुवातीला मला आर्मी ऑफिसर व्हायचे होते. लहानपणापासून माझे स्वप्न होते की, मी आर्मीमध्ये काम करायचे. यासाठी मी कठोर परिश्रम घेतले. मात्र मी अपयशी ठरलो. चार वर्षात आठ वेळा अपयश आल्यामुळे मी दारूच्या अधीन गेलो. अपयश आणि दारू यामुळे मी पूर्णपणे नैराश्यामध्ये गेलो. मी माझ्या अपयशाला सांभाळू शकलो नाही. वयाच्या केवळ १९ व्या वर्षी दारूत बुडालो होतो. तब्बल सात वर्ष मी नैराश्यात होतो. त्याने मला मारूनच टाकले होते. दारूमुळे मला गंभीर आजार देखील झाला.”

विजय यांनी त्या मुलाखतीमध्ये हे देखील सांगितले की, रुग्णालयात त्यांना भरती केल्यानंतर त्यांची वाचण्याची शक्यता केवळ १५ टक्के एवढीच होती. मात्र महिनाभराच्या उपचारानंतर त्यांना बरे वाटले आणि त्यांनी पुन्हा संघर्ष केला आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करत करियर घडवले. आज ते त्यांच्या भारदस्त आवाजासाठी ओळखले जातात.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पंधराच दिवसात आईवडील गमवणाऱ्या लेखिकेबद्दल आणि सेटवर काम करणाऱ्यांबद्दल मिलिंद गवळी यांची ‘ती’ पोस्ट व्हायरल

‘जैतर’ मधून समोर येणार सत्यघटनेवर आधारित रोमांचक प्रेमकहाणी, ‘या’ तारखेला प्रदर्शित हाेणार चित्रपट

हे देखील वाचा