Saturday, July 27, 2024

पंधराच दिवसात आईवडील गमवणाऱ्या लेखिकेबद्दल आणि सेटवर काम करणाऱ्यांबद्दल मिलिंद गवळी यांची ‘ती’ पोस्ट व्हायरल

आपल्याला नेहमीच मालिका बघताना मजा येते. कधी कधी मालिकेमध्ये काही रंजक चालू असेल तर ही मालिका संपूच नये असे वाटत असते. कलाकार, शूटिंग, ग्लॅमर आदी अनेक गोष्टी पाहून आपल्याला मनोरंजनविश्वाबद्दल नेहमीच एक आकर्षण वाटत असतं. मात्र खरंच या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या आहेत का? मालिकांबद्दल बोलायचे झाले तर मालिकेचे एक 20/ 25 मिनिटाचा भाग शूट करण्यासाठी बरेच तास किंबहुना दिवस देखील लागत असतात.

शूटिंग योग्य आणि कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण होण्यासाठी सेटवर काम करणारी अनेक माणसं रात्रंदिवस झटत असतात. मात्र ते कधीच कुठेही समोर येत नाही आणि त्यांचे काम झाकोळले जाते. मात्र अभिनेते मिलिंद गवळी यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे, जी फक्त अशा सेटवर काम करणाऱ्या आणि इतर पडद्यामागे काम करणाऱ्या लोकांसाठी समर्पित आहे.

या लोकांना त्यांच्या वैयक्तिक समस्या नेहमीच मागे ठेऊन काम करत राहावे लागते. अशातच आई कुठे काय करते? या सुपरहिट मलिकेच्या लेखिका असणाऱ्या नमिता वर्तक यांचे वडील वारले आणि १६ दिवसांनी लगेच आई वारली. अचानक आलेल्या या दोन्ही संकटांमुळे ती कोलमडली मात्र तरीही तिने शोचे सीन्स लिहिले. या सर्व कलाकारांच्या कामाबद्दल असणाऱ्या प्रेमाला समर्पित पोस्टमध्ये मिलिंद गवळी यांनी लिहिले,

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

“Behind the Scene
खऱ्या आयुष्यामध्ये जे आपण डोळ्यांनी बघतो ते नेहमीच तेच खरं असतं असं नाहीये,
जे आपल्याला दिसतं त्याच्यामागे खूपशा गोष्टी दडलेल्या, ज्या आपल्यासमोर कधीच येत नाहीत,
आपण जे डोळ्यांनी जे पाहतो तेवडच आपल्या ला दिसत असतं, खूपशा गोष्टी behind the scene असतात आणि खूप काही between the lines ही असतं. जे कधीच नाही दिसत,
आणि या सिनेमा नाटक सिरीयल या क्षेत्रामध्ये तर सगळंच behind the scene नच असतं,
सिरीयल चा 23 – 24 मिनिटाचा एपिसोड साठी कित्येक दिवस बरीचशी मंडळी बरच काही करत असतात , पडद्याच्या मागे खूप काही घडत असतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्याला दिसस नाही,
दिसत नाही तो लेखक, जो रात्रंदिवस तो डोकं फोडी करत असतो, आता लोकांना काय आवडेल, कुठल्या कलाकाराचा ट्रॅक लोकांना आवडतोय, तो लिहिल्यानंतर कळतं की कलाकाराकडे dates available नाहीयेत, तो कलाकार आजारीच पडला आहे, मघ परत लेखक डोके फोडी करतो, परत पुन्हा सगळं लिहून काढतो.
बर लेखकाचं जर सगळं सुरळीत चाललं असेल तर तो हे पण सगळं आनंदाने करतो,
पण जर लेखकाच्याच आयुष्यात खूप काही घडत असेल , उलथा पालत होत असेल तर,
“आई कुठे काय करते “ च्या लेखिका नमिता वर्तक हिचे वडील प्रसिद्ध समीक्षक कमलाकर नाडकर्णी बरेच महिने आजारी होते, त्यांची सगळी सुश्रुषा करत करत दवाखान्यात सुद्धा नमिताने “आई कुठे काय करते” चे एपिसोड लिहून दिले, 11 मार्चला रात्री दहा वाजता नाडकर्णी काकां गेले, त्या दुःखात सुद्धा “ आई कुठे काय करते “ चे एपिसोड नमिताने लिहून देत होती, काल 27 मार्च रोजी म्हणजे 16 दिवसांनी आजारपणामुळे नमिताची आई गेली,
नमिताच्या दुःखाची कल्पनाच करवत नाही, आभाळा एवढं दुःख हेच असतं बहुतेक.
हे behind the scenes
जे कधी येत नाही प्रेक्षकांसमोर..
हे सगळं सहन करायची तिला शक्ती मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”

मिलिंद गवळी यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून, त्यांच्या या पोस्टवर कमेंट्स करताना नेटकऱ्यांनी देखील या सर्व लोकंचे आणि कलाकारांचे कौतूक केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खळबळजनक! अजून एका लोकप्रिय अभिनेत्रीने संपवले जीवन, अभिनयासोबतच गायनातही होती कुशल
‘करण-अर्जुन’ सिनेमासाठी सलमान खान नाही तर ‘हा’ सुपरस्टार होता पहिली पसंत, राकेश रोशन यांचा खुलासा

हे देखील वाचा