Tuesday, July 9, 2024

अक्षराने निरहुआला खेचले आपल्या ‘खोट्या प्रेमाच्या’ जाळ्यात ; ‘जान लेबू का’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ

बॉलिवूड चित्रपटांप्रमाणेच भोजपुरी चित्रपटांमधील गाणी, ऍक्शन आणि रोमान्सने प्रेक्षकांना वेड लावले आहे. अशात भोजपुरी चित्रपटांचा जुबली स्टार दिनेश लाल यादव निरहुआचा ‘जान लेबू का’ हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मंगळवार (३१ ऑगस्ट) चित्रपटाचा ट्रेलर ‘एसआरके म्युझिक’ या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाला आहे. ‘जान लेबू का’ या चित्रपटामध्ये अक्षरा सिंग दिनेशबरोबर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात त्या दोघांची जबरदस्त केमेस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अभिनेत्री अक्षरासाठी हा चित्रपट खूप फायद्याचा ठरत असल्याचं दिसत आहे. सध्या ती ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये चाहत्यांची मने जिंकत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाल्याने याचा फायदा तिच्या आगामी चित्रपटाला देखील होणार आहे. ‘जान लेबू का’ या चित्रपटाच्या ट्रेलरला अक्षराच्या बिग बॉसच्या घरात मिळालेल्या चाहत्यांनी देखील खूप पसंती दाखवली आहे. बिग बॉसच्या घरात ती चाहत्यांची मने जिंकतच आहे. अशात या चित्रपटातून देखील तिच्या अभिनयाने ती चाहत्यांना खुश करणार आहे. (Bigg Boss’s Akshara Singh implicates Nirahua in the ‘false love’ trap! Trailer release of Jaan Lebu Ka)

कसा आहे ‘जान लेबू का’ चित्रपटाचा ट्रेलर?
‘जान लेबू का’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुरुवातीलाच ‘एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो’ असा डायलॉग आहे. डायलॉग ऐकून हा चित्रपट एका गंभीर विषयावर आधारित आहे, असे वाटते. परंतु लगेचच दुसऱ्या मिनिटाला अक्षरा दिनेशच्या सणसणीत कानाखाली मारते. यामध्ये दिनेशला अक्षरा तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत आहे. परंतु दिनेश एकदम चांगला मुलगा असल्याने त्याला हे पटत नाही, असे दाखवण्यात आले आहे. तो तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे. परंतु ती काही त्याला सोडायला तयार नाही. संपूर्ण ट्रेलरमध्ये त्या दोघांमधील वाद, प्रेम आणि रोमान्स पाहायला मिळत आहे.

प्रेक्षकांनी या ट्रेलरला चांगलीच पसंती दिली आहे. चाहत्यांचे देखील या ट्रेलर व्हिडिओवर तुफान प्रेम बरसत आहे. या ट्रेलरला आतापर्यंत ३ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

दिनेश लाल यादव निरहुआ आणि अक्षरा सिंग अभिनित ‘जान लेबू का’ या चित्रपटाचे दिगदर्शन दिनकर कपूर यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती आणि कथा श्रेय श्रीवास्तव यांनी लिहिली आहे. चित्रपटासाठी मजेशीर डायलॉग मंगेश केदार आणि प्रवेश कुमार यांनी लिहिले आहेत. मनाला भुरळ पडणारे या चित्रपटातील म्युझिक ओम जाह यांचे आहे. एकूणच या चित्रपटामध्ये कॉमेडी, रोमान्स,ॲक्शन आणि भरपूर ड्रामा पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कमरिया गर्ल’नंतर आता ‘बेबो’ बनली आकांक्षा दुबे; करीनाची नक्कल करत दाखवल्या हॉट अदा

-‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका

-‘या’ कलाकारांनी किस करून लावली होती पडद्यावर आग; आमिर अन् करिश्माचाही आहे समावेश

हे देखील वाचा