Wednesday, December 6, 2023

‘या’ कलाकारांनी किस करून लावली होती पडद्यावर आग; आमिर अन् करिश्माचाही आहे समावेश

आजकाल, बॉलिवूड चित्रपटांमध्ये रोमान्स दाखवण्यासाठी किसिंग सीन्सची गरज भासते आहे. अशा परिस्थितीत आता लिपलॉक आणि फ्रेंच किस सारखे सीन्स कॉमन झाली आहेत. असे काही चित्रपट आहेत, ज्यात मुख्य जोडप्याने रोमान्स दाखवण्यासाठी किस केले. रोमान्ससाठी चित्रीत केलेली काही दृश्ये हॉट आणि बोल्डच्या श्रेणीत आली. परंतु, अजूनही असे अनेक कलाकार आहेत जे पडद्यावर आपल्या सहकलाकारांना किस देत नाहीत. त्याच वेळी, काही कलाकार असे आहेत, ज्यांची ओळख फक्त किसिंग सीन्ससाठी केली जातात. चला जाणून घेऊया बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड किसिंग सीन्सबद्दल.

जब वी मेट
मिळालेल्या माहितीनुसार, करीना आणि शाहिदचे ‘जब वी मेट’ चित्रपटापूर्वीच ब्रेकअप झाले होते. पण, या चित्रपटातील त्याच्या किसिंग सीनची खूप चर्चा झाली. त्यांनी या चित्रपटात एक पॅशनेट किसिंग सीन दिला होता. जेव्हा गीतला अंशुमन आणि आदित्य यांच्यामध्ये निवड करायची असते. तेव्हा ती पहिल्यांदाच तिच्या हृदयाचे ऐकते आणि इथे शाहिद, करीनाचा किसिंग सीन आहे. (These are the hottest kissing actors in Bollywood, check it out )

गोलियों की रासलीला राम-लीला
राम-लीलामध्ये दीपिका आणि रणवीरची जबरदस्त केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अनेक किसिंग सीन्स आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग आणि दीपिकामधील आतापर्यंतचा सर्वात हॉट किसिंग सीन पाहायला मिळाला होता.

राजा हिंदुस्तानी

‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटात आमिर खान आणि करिश्मा कपूर यांनी पावसात भिजताना दीर्घकाळ किस केले. या किसने बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले होते. असे म्हटले जाते की, हिंदी चित्रपटात पाहिलेला हा सर्वात जास्त वेळ चाललेला किसिंग सीन होता. जरी आज आपल्यासाठी ही मोठी गोष्ट नसेल, पण त्या काळात ही एक मोठी गोष्ट होती.

जिंदगी न मिलेगी दोबारा
‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटातील ऋतिक आणि कॅटरीना कैफचे हॉट किसिंग सीन आजपर्यंत कोणी विसरू शकत नाही.

आशिक बनाया आपने
‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटात बॉलिवूड सीरियल किसर इमरान हाश्मीने ब्यूटी क्वीन तनुश्री दत्ताला बराच वेळ किस केले. इम्रान हाश्मी बॉलिवूडमध्ये केवळ त्याच्या किसिंगसाठी ओळखला जात असला, तरी या किसची बाब वेगळीच होती. ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातील बोल्ड गाण्यानंतर तनुश्रीची इमेजही एका बोल्ड अभिनेत्रीची बनली.

मसान
विकी कौशल आणि श्वेता त्रिपाठी यांचा ‘मसान’ चित्रपटात अतिशय निरागस आणि रोमँटिक किसिंग सीन आहे. चित्रपटाच्या एका गाण्यात त्या दोघांच्या किसिंग सीनवरून हॉटनेसची लेव्हल वाढली होती.

परिणीता
‘परिणीता’ या चित्रपटातील संजय दत्त आणि विद्या बालन यांच्या किस सीनने जणु काय पडद्यालाच आग लावली. या सीनमध्ये विद्याच्या अभिनयाकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे.

ये जवानी है दीवानी

‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटात रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्यातील किसिंग सीन सर्वांच्या लक्षात राहण्यासारखे आहेत. या दोघांच्या जोडीला सर्वात हॉट कपलच्या यादीत स्थान दिले जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’

-Bigg Boss OTT: लाजून लाल झाली शमिता, जेव्हा करणने ‘हॉटनेस’वर प्रश्न विचारताच राकेश म्हणाला…

-‘टायगर ३’साठी कॅटरिना कैफ रशियाला रवाना; स्टंट सीन शूट करण्यासाठी घेतीये प्रचंड मेहनत

हे देखील वाचा