‘बिग बॉस ओटीटी’ सुरू झाल्यापासून सतत चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग रौद्र रूप पाहायला मिळत आहे. ती भोजपुरी इंडस्ट्री किंवा यूपी-बिहारबद्दल कोणतीही वाईट गोष्ट ऐकायला तयार नाही, असे जर कोणी काही बोलले तर ती त्यावर लगेच विरोध करते. जे पाहून संपूर्ण घर हैराण झाले आहे. मात्र यामुळे तिचे फॉलोव्हर्स आणि भोजपुरी इंडस्ट्रीमधील लोक खूप आनंदी आहेत आणि तिची खूप स्तुती करत आहेत. यासह, तिला अनेक शुभेच्छा पाठवल्या जात आहेत, की ती देशभरात ओळखली जावी आणि शो जिंकूनच परत यावी.
भोजपुरी सुपरस्टार अक्षरा सिंग यावेळी बिग बॉसच्या घरात भोजपुरीचे प्रतिनिधित्व करत आहे. आतापर्यंतची तिची कामगिरी खूपच प्रशंसनीय दिसत आहे. तिचे अनेक सहकारी कलाकार सोशल मीडियावर तिच्यासाठी संदेश पोस्ट करत आहेत. दरम्यान तिच्यासोबत काम केलेला अभिनेता नीरज यादवही म्हणाला की, बिग बॉस जिंकूनच अक्षरा सिंगने परत यावे आणि भोजपुरीचे मान वाढवावा.
नीरज यादव हा भोजपुरी चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारतो. नीरज म्हणाला की, “अक्षरा खूप चांगली कलाकार आणि सहाय्यक व्यक्ती आहे. जेव्हा मी तिच्यासोबत पहिल्यांदा काम केले, तेव्हा तिच्या पाठिंब्यामुळे आम्ही चित्रपट करू शकलो.” नीरज यादवने अक्षरा सिंगसोबत ‘प्रतिघात’ हा चित्रपट केला आहे.
त्याचबरोबर तो म्हणाला की, “तिचा स्वभाव अतिशय मैत्रीपूर्ण आहे. मी तिला इतकेच सांगेन की, तू खंबीरपणे लढ. असे होईल की भोजपुरी पार्श्वभूमीमुळे इतर तुला अपमानित करण्याचा प्रयत्न करतील. परंतु अक्षरा, तू ठाम राहा. आम्ही तुला भरभरून वोट देऊ आणि प्रेक्षकांना देखील आवाहन करू की, तुलाच मत द्या.” त्याचबरोबर नीरजने शोचे होस्ट करण जोहरबद्दल बोलताना तो निष्पक्ष असल्याचे सांगितले आणि शोमध्ये कोणावरही अन्याय होऊ शकत नाही असेही तो म्हणाला.
यूपी, गोरखपूरचा रहिवासी असलेला अभिनेता नीरज यादवने आतापर्यंत दिनेशलाल यादव निरहुआ, रवी किशन, खेसारीलाल यादव यांसारख्या कलाकारांबरोबर ४५ चित्रपट केले आहेत. त्याचबरोबर त्याने आपल्या अभिनयाची जादू साउथ इंडस्ट्रीमध्येही पसरवली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-ही आहे हॉलिवूडमधील सर्वाधिक श्रीमंत कलाकारमंडळी, संपत्तीचा आकडा पाहून तुम्हीही व्हाल दंग