अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) कोरोना लॉकडाऊनच्या काळापासून लोकांसाठी देवदूत म्हणून समोर आला आणि तेव्हापासून तो सतत लोकांना मदत करत आहे. त्यासाठी त्याने एक फाउंडेशनही स्थापन केले आहे. यावेळी आता बिहारमधील एका मुलीची कहाणी सर्वांची मनं जिंकत आहे. ही चिमुरडी रोज एका पायावर चालत शाळेत जाते. मुलीच्या शिक्षणाची आवड पाहून लोक तिचे कौतुक करत आहेत. त्याचवेळी अभिनेता सोनू सूद यानेही या मुलीला मदत करण्याचा निर्णय घेतला असून, त्याने याबाबत ट्वीटही केले आहे.
‘दोन्ही पायांवर चालण्याची वेळ आली आहे’
अभिनेता सोनू सूदने ट्वीट करून लिहिले की, “आता ती एका नव्हे, तर दोन्ही पायावर शाळेत जाईल. तिकीट पाठवत आहे. चला दोन्ही पायांवर चालण्याची वेळ आली आहे. सध्या अभिनेता सोनू सूदलाही जाणार आहे.” पुढे अभिनेत्याने काहीही स्पष्ट लिहिलेले नाही. पण त्याचे ट्वीट पाहून असे वाटते की, तो तिला कृत्रिम पाय मिळवून देण्यास मदत करू शकतो. मात्र याशिवाय अनेक राजकारण्यांनीही ट्वीट केले आहे आणि जमुईच्या डीएमने मुलीला ट्रायसायकल देखील दिली आहे. याशिवाय इतर संस्थाही मुलाच्या मदतीची आणि उपचाराची हमी देत आहेत. (bihar girl walking to school for 1 km on 1 leg sonu sood plays saviour again)
अब यह अपने एक नहीं दोनो पैरों पर क़ूद कर स्कूल जाएगी।
टिकट भेज रहा हूँ, चलिए दोनो पैरों पर चलने का समय आ गया। @SoodFoundation ???????? https://t.co/0d56m9jMuA— sonu sood (@SonuSood) May 25, 2022
सोनूचे वर्कफ्रंट
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सोनू सूद नुकताच ‘आचार्य’ चित्रपटात दिसला. या चित्रपटात अभिनेता रामचरण आणि चिरंजीवी मुख्य भूमिकेत होते, मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. याशिवाय अभिनेता अक्षय कुमार स्टारर ‘पृथ्वीराज’ या चित्रपटातही दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनू सूद या चित्रपटात चांद बरदाईच्या भूमिकेत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा