×

‘भोंग्या’च्या वादात आता ‘देव’माणूस सोनू सूदची उडी! म्हणतोय, ‘…विष उधळत आहेत’

देशात सध्या सुरू असलेल्या लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसा वादात आता अभिनेता सोनू सूदही (Sonu Sood) उतरला आहे. या प्रकरणी अभिनेत्याने उघडपणे आपली भूमिका मांडली आहे. लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसा यावरून झालेल्या वादावर त्याने दु:ख व्यक्त करत, लोकांना एकत्र राहण्याचे आवाहन केले आहे. सोनू सूदने पुण्यात झालेल्या ‘JITO Connect 2022’ समिटमध्ये या वादावर वक्तव्य केलं आहे.

सोनू सूदने या प्रकरणी बोलताना कोरोना कालावधीचा उल्लेख केला. तो म्हणाला की, “हनुमान चालीसा आणि लाऊडस्पीकरवरून सुरू असलेला वाद खूप दुखावतो आणि लोक ज्याप्रकारे एकमेकांवर विष उधळत आहेत, ते देखील मन तोडते. गेल्या अडीच वर्षांत आपण एकत्र येऊन कोरोनाचा सामना केला आहे. त्यामुळे आपण याबाबतीतही एकत्र राहिले पाहिजे.” (sonu sood reaction on loudspeaker and hanuman chalisa controversy)

याशिवाय तो पुढे म्हणाला, “कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जेव्हा लोकांना ऑक्सिजनची गरज भासत होती, तेव्हा कोणीही धर्माची पर्वा केली नाही. सर्वांनी एकमेकांना मदत केली. या काळात राजकीय पक्षांनीही एकत्र काम केले. कोरोना महामारीने सर्वांना एकत्र केले होते.” चांगला देश घडवण्यासाठी राजकीय पक्षांना एकत्र येण्याचे आवाहनही त्याने केले. माणुसकीच्या आधारे योगदान देण्यासाठी आपण धर्म आणि जातीच्या सीमा तोडल्या पाहिजेत, असे अभिनेता यावेळी म्हणाला.

सोनू सूदने पहिल्यांदाच लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसा वादावर आपले मत मांडले आहे. देशात सुरू असलेल्या प्रत्येक मुद्द्यावर तो नेहमीच आपले मत मांडतो. त्याचबरोबर कोरोनाच्या काळातही त्याने अनेकांना मदत केली होती. अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर नुकताच त्याचा ‘आचार्य’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील त्याचे काम खूप पसंत केले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post