बॉलीवूड अभिनेता इम्रान हाश्मी आणि अभिनेत्री सनी लियोनी यांचा मुलगा बिहारच्या मुजफ्फरपुर मध्ये सापडला आहे. हो विश्वास बसत नाहीयेना. तुम्ही म्हणाल काहीपण काय बोलतायराव? हो बरोबर आहे आधी पूर्ण प्रकरण तर ऐकून घ्या. सध्या सोशल मीडियावर एक परीक्षा फॉर्म चांगलाच वायरल होत आहे. त्या फॉर्म मध्ये वडिलांच्या नावासमोर इम्रान हाश्मी तर आईच्या नावासमोर सनी लियोनी लिहले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.
बिहार मधील एका कॉलेजच्या वेबसाईटवर दुसऱ्या सत्राच्या परीक्षांचे फॉर्म भरले जात आहे. त्यात एका खोडकर विद्यार्थ्याने चुकीचा फॉर्म भरला आहे. त्यात त्या मुलाने वडिलांच्या नावासमोर इम्रान हाश्मी तर आईच्या नावासमोर सनी लियोनी लिहले असून घरच्या पत्त्यासमोर चतुर्भुज या रेड लाईट परिसराचे नाव लिहले आहे.

सोबतच त्या महाभागने फॉर्म मेल आय.डी आणि मोबाइल नंबर टाकून फॉर्म त्याने सोशल मीडियावर वायरल केला आहे. बिहारच्या विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या बाबासाहेब भीमराव आंबेडकर या विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या मिनापूरच्या धनराज महतो कॉलेजच्या एका विद्यार्थ्याने ही मस्ती केल्याचे समजत आहे.
हा फॉर्म वायरल होताच विद्यापीठात आणि कॉलेजमध्ये एकच गोंधळ माजला. परीक्षा नियंत्रक डॉ. मनोज कुमार यांनी सांगितले, ” असा फॉर्म जर खरंच विद्यापीठाच्या वेबसाईटवर असेल तर त्या फॉर्मची दोन स्तरावर पडताळणी केली जाईल. त्यात काही सापडल्यास त्या फॉर्मला बाद ठरवले जाईल.”
काही जणांचे असे म्हणणे आहे की ह्या फॉर्मला फोटोशॉप मध्ये बनवले गेले आहे. फोटोशॉप करून त्यावर असलेली माहिती लिहण्यात आली आहे.