Monday, July 1, 2024

बिपाशा बसूला होता ‘या’ गोष्टीचा कॉम्प्लेक्स, म्हणूनच तिला नव्हते व्हायचे अभिनेत्री

अनेकदा अनेक व्यक्तींना स्वतःबद्दल कोणतातरी एक वेगळा न्यूनगंड असतो. माझ्यामध्ये अमुक एक गोष्ट कमी आहे. ही भावना सतत त्यांना जाणवत असते. त्यामुळेच कदाचित आपली कमी जगासमोर येऊ नये यासाठी ते ती कमी लपवण्यासाठी जीवनात काहीतरी वेगळे करण्याचे ठरवतात. मात्र नशिबात जे असते ते तर होऊनच राहते. असेच काहीसे घडले आहे बॉलिवूडची बंगाली ब्युटी असणाऱ्या बिपाशा बसूसोबत.

बॉलिवूडची अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून बिपाशा बसू ओळखली जाते. बिपाशाने अनेक चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय केला आहे. मुख्य अभिनेत्रीपासून ते नकारात्मक भूमिकेपर्यंत सर्वच प्रकारच्या भूमिका तिने लीलया पेलल्या. आज बिपाशा चित्रपटांपासून दूर असली तरी तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही. एक गोष्ट जाणून तुम्ही हैराण व्हाल की, बिपाशा बसूला आधी अभिनेत्री व्हायचे नव्हते. यामागे एक खास कारण देखील होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

मीडिया रिपोर्ट्सनुसार बिपाशाला आधी वाटायचे की, ती सुंदर नाही. यासाठीच तिने कधी अभिनेत्री होण्याचा विचारच केला नाही. तिला डॉक्टर व्हायचे होते. मात्र नंतर तिला ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये हळूहळू इंटरेस्ट यायला लागला. बिपाशाने हळूहळू मॉडेलिंग करत तिच्या करियरची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात ती पार्ट टाईम मॉडेलिंग करायची, यामुळे त्याचा प्रभाव तिच्या अभ्यासावर होऊ लागला. मग पुढे ती पूर्णपणे मॉडेलिंग आणि अभिनय करण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात आली. मात्र नंतर तिला अभ्यास सोडल्याचा खूप पश्चाताप झाल्याचे तिने सांगितले. लहान असताना बिपाशाचा लूक एकदम टॉम बॉय सारखा होता. तिला तिचे मित्र लेडी गुंडा म्हणायचे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

पुढे बिपाशाने तिच्या करियरची सुरुवात २००१ साली ‘अजनबी’ सिनेमातून झाली. या सिनेमात तिने सहायक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिला फिल्मफेयरचा पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर तिने ‘राज’ या सिनेमात मुख्य अभिनेत्री साकारली आणि ती एका रात्रीत स्टार झाली. बिपाशाला देखील तिच्या करियरमध्ये सावल्या रंगामुळे अनेक अडथळे आले. मात्र ते सर्व पार करत तिने एक उत्तम अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवला.

बिपाशाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर तिने टेलिव्हिजन अभिनेता असलेल्या करणसिंग ग्रोव्हरसोबत लग्न केले. नुकतीच त्यांना एक मुलगी देखील झाली. त्यांनी तिचे नाव ‘देवी’ ठेवले आहे. करण आणि बिपाशाची ओळख ‘अलोन’ या सिनेमाच्या सेटवर झाली आणि पुढे त्यांनी लग्न केले.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मसकली गाण्याच्या रिमेकवर ए.आर रेहमान यांची नाराजी? म्हणाले, ‘मुळ गाणे बनवायला 365 दिवस…’

ए पळा पळा..! गायिकेने असा काही सुर छेडला की, माणसांसह कुत्र्या-मांजरांची झाली पळापळ, पाहा रेहमानने शेअर केलेला भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा