Tuesday, June 18, 2024

पैशावाल्यांचे गिफ्ट बी भारीच राव! बिपाशा बसूने लेकीला दिली तब्बल ‘इतक्या’ लाखांची भेट, व्हिडिओ झाला व्हायरल

सध्या अभिनयापासून लांब आणि आपल्या लेकीच्या सहवासात राहून मदरहूडचा आनंद घेणारी अभिनेत्री म्हणजे बंगाली ब्युटी बिपाशा बसू. मात्र ती सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे. ती सतत तिच्या मुलीबद्दल विविध पोस्ट शेअर करताना दिसत असते. यासोबतच ती फॅशनची विविध अपडेट्स देखील देत असते. अशातच तिने एक नवीन गाडी खरेदी केल्याची माहिती इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर करत दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

बिपाशा बसूने नवीन गाडी घेतल्याचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या नवऱ्यासोबत अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत ऑडी क्यू 7 ची डिलिव्हरी घेताना दिसत आहे. कार घेण्याआधी त्यांनी केक कापून त्यांचा आनंद देखील साजरा केला. व्हिडिओमध्ये बिपाशाचा लूक अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. यावेळी तिने व्हाईट आणि ब्लॅक लाइनचा शर्ट आणि जीन्स घातली आहे. ९२ लाख रुपये आहे.

दरम्यान बिपाशा आणि करण यांनी २०१६ साली लगीनगाठ बांधली आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये ते एका मुलीचे आईबाबा झाले. बिपाशाने मुलीच्या जन्मानंतर अनेक दिवसांनी तिचा चेहरा सर्वांना दाखवला. आता मात्र ती सतत देवीसोबत वेळ घालवताना आणि मदरहूड एन्जॉय करताना दिसते. चित्रपटांमध्ये कमी दिसणारी बिपाशा सोशल मीडियावर सक्रिय असण्यासोबतच टीव्हीवर ती विविध कार्यक्रमांमध्ये दिसत असते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘प्रत्येक दिवस मधुचंद्रासारखा आहे’, वैवाहिक जीवनाबद्दल काय बोलली दलजीत कौर? एकदा वाचाच

सुंबुलवर काेसळला दु:खाचा डाेंगर; अभिनेत्री हंबरडा फाेडत म्हणाली, ‘तू नेहमी माझ्या हृदयात राहशील’

हे देखील वाचा