Tuesday, June 25, 2024

‘प्रत्येक दिवस मधुचंद्रासारखा आहे’, वैवाहिक जीवनाबद्दल काय बोलली दलजीत कौर? एकदा वाचाच

टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरच्या लग्नाला 2 महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. निखिल पटेलसोबत लग्न केल्यानंतर दलजीत केन्याला शिफ्ट झाली आहे. इथे दलजीत मुक्तपणे आयुष्य जगत आहे. इथून ती व्लॉगिंगही करतेय, ज्याचे व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. अभिनेत्री पती निखिल पटेलसोबत रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर करते. अशात आता अभिनेत्रीने सांगितले की, ‘तिच्या पतीसोबत प्रत्येक दिवस हनीमूनवर असल्यासारखा जातो.’

माध्यमाना दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री दलजीत काैर (dalljiet kaur ) म्हणाली, “मी रोज हनीमूनप्रमाणे जगतेय, जे कधी संपतच नाही. नैरोबी खूप सुंदर ठिकाण आहे. जे भारतातील आहेत आणि त्यांना याबद्दल माहिती नाही त्यांनी आफ्रिका पाहावी. मला स्वतःला हे सौंदर्य आणि संस्कृती माहित नव्हती. हे शहर मला भारताची आठवण करुण देते. इथे खूप आपलेपणा आहे.”

दलजीत आणि निखिलचे लग्न 18 मार्च 2023 रोजी झाले होते. दलजीतचे हे दुसरे लग्न आहे. याआधी तिचे लग्न शालीन भानोतसोबत झाले होते, पण दोघांनी हे लग्न मोडून घटस्फोट घेतला. या लग्नातून शालीन आणि दलजीत यांना एक मुलगाही आहे.

दलजीत कौरच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर तिला कामाबद्दल निवडक बनायचे आहे. ती म्हणाली, ‘मी काही स्टाेरीज लिहिल्या आहेत आणि त्या प्रोडक्शन हाऊसला पाठवत आहे. दिग्दर्शक म्हणून मी लवकरच केन्यामध्ये माझ्या पहिल्या वेब शोचे शूटिंग सुरू करू शकते. आता हेच माझे लक्ष आहे, मला क्रियेट आणि प्राेड्यूस करायचे आहे. एक अभिनेत्री म्हणून मला काही निवडक प्रोजेक्ट्स देखील करायचे आहेत.(tv actress dalljiet kaur on life with husband said i am living my honeymoon every day )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
B’day Special | जेनिफर विंगेटचे ‘हे’ पाच बोल्ड लूक पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात
परिणीती चाेप्राने ‘चमकिला’चा टीझर केला पाेस्ट; म्हणाली, ‘आपण त्यांचा आवाज ऐकला आहे, पण…’

हे देखील वाचा