बॉलिवूड अभिनेत्री या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सुरुवातीला त्यांचे अफेअर बॉयफ्रेंड, लग्न या गोष्टीमुळे त्या चर्चेत असतात, तर लग्न होताच त्यांचा संसार आणि मुले यामुळे माध्यमांमध्ये चर्चा रंगतात. लग्न होताच काही दिवसांतच त्यांच्या प्रेग्नेंसीबाबत अफवा पसरायला सुरुवात होते. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींच्या बाबतीत अशा बातम्या समोर आल्या आहेत. अभिनेत्री बिपाशा बासूच्या नावाचा देखील या यादीत समावेश आहे. तिने चार वर्षापूर्वी अभिनेता करण सिंग ग्रोवर याच्याशी लग्न केले आहे. आतापर्यंत अनेकवेळा तिच्या प्रेग्नेंसीबाबत अफवा पसरल्या आहेत.
या अफवांवर बिपाशाने तिचे मत मांडले आहे. तिने सांगितले की, “जर लग्न झालेल्या महिलेचे थोडेसे वजन वाढले, तर याचा अर्थ असा होत नाही की, ती आई होणार आहे. माझ्या कुटुंबात सगळं काही आहे, आणि मला माहित आहे की, माझे वजन वाढल्यावर नेहमीचं माझ्या प्रेग्नेंसीबाबत प्रश्न उभे केले जातात.” तिने पुढे सांगितले की, “जरी ती ग्लॅमरस दुनियेतील असली, तरीही तिचे वजन वाढणे ही अगदी साहजिक गोष्ट आहे.” (Bipasha Basu opened about pregnancy rumour says mu pregnancy will be there until people see me with baby)
बिपाशाने पुढे सांगितले की, “मला माहित आहे मी फिटनेसची एंबेसेडर आहे. मात्र, कधी कधी असे प्रसंग येतात, जेव्हा मी पुढे निघून जाते आणि खुल्या मनाने आयुष्य जगते. याचा अर्थ असा नाही की, मी अस्वस्थ होत आहे. मात्र, जोपर्यंत लोकं मला एका लहान मुलासोबत बघणार नाही, तो पर्यंत ते वेगवेगळे अंदाज लावतच राहतील.”
तिने सांगितले की, “लोक माझ्याबाबत काय विचार करतात याने मला काहीच फरक पडत नाही. कारण असे तर नाही ना की, ते लोक माझ्याबाबत काही चुकीचा विचार करत आहेत. हो मी प्रेग्नेंट नाहीये, तर ही कदाचित त्यांच्यासाठी दुःखद बातमी असू शकते.”
बिपाशाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, या आधी ती ‘डेंजरस’ या चित्रपटात दिसली होती. बिपाशाने सांगितले होते की, “मी बऱ्याच काळापासून चित्रपटात काम केले नाही. कोरोनाने माझ्या मनाला अडवले आहे. मला कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाहीये. मी कोणतेही स्क्रिप्ट वाचत नव्हते किंवा काहीही लिहित नव्हते, पण आता मी पूर्णपणे तयार आहे.”
बिपाशाने करण सिंग ग्रोवरला काही काळ डेट केले. त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नानंतर अगदी काही दिवसातच अशा बातम्या येऊ लागल्या होत्या की, बिपाशा आई होणार आहे. मात्र, या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचे तिने सांगितले होते. त्या दोघांचा एका लहान मुलासोबत फोटो व्हायरल झाला होता, तेव्हा सगळेजण हैराण झाले होते. नंतर समजले की, ते त्यांच्या मित्राचे बाळ होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-काय सांगता! प्रियांका चोप्राला एका माकडाने मारली होती थोबाडीत