Thursday, April 18, 2024

जयंती विशेष | जेव्हा मन्ना डे यांनी प्रेमिकेसाठी घातला होता वडिलांशी वाद; वडिलांनी ऐकलं नाही, तर आईने लाऊन दिले लग्न!

बॉलिवूडमध्ये असे बरेच संगीतकार आहेत, ज्यांनी आपल्या अप्रतिम प्रतिभेचा वापर करून अनेक हिट चित्रपटांची गाणी सजवली. त्यातीलच एक प्रसिद्ध नाव म्हणजे मन्ना डे. (MANNA DEY) आपल्या ६० वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीत, मन्ना डे यांनी एकापेक्षा एक उत्तम आणि सदाहरित गाणी तयार केली आहेत, जी आजही आपल्यासारख्या संगीत रसिकांच्या जिभेवर असतात.

चित्रपट ‘आनंद’ मधील ‘जिंदगी कैसी है पहेली’ गाण्याद्वारे मन्ना डे यांनी सांगितले की, हे आयुष्य आपल्याला एका क्षणात कसे रडवते आणि काही मिनिटांतच हसवतेही. ‘उपकार’ चित्रपटाच्या ‘कसमें वादे प्यार वफा’ या गाण्यावरून त्यांनी सांगितले की, आश्वासने व वचनं केवळ बोलायच्या गोष्टी आहेत आणि हे कोणीही बोलू शकतो. जर नात्यात प्रेम नसेल, तर प्रेमाने बोललेले शब्दही बेईमानीसारखे वाटू लागतात. तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीला सर्वोत्कृष्ट गाणी देणारे मन्ना डे यांची १ मे जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्ताने त्यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया…

अशी होती मन्ना डे यांची ‘लव्ह-लाईफ’
एके दिवशी मन्ना डे आणि त्यांच्या मित्रांनी रवींद्रनाथ टागोर जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. मन्ना डे यांच्या मित्रांनी त्यांना जयंती उत्सवाची संपूर्ण जबाबदारी सोपविली होती. जेव्हा ते समारंभाच्या तयारीमध्ये गुंतले होते, तेव्हा त्यांची एका मुलीशी भेट झाली. ही मुलगी होती, सुलोचना कुमारन. केरळमध्ये जन्मलेल्या सुलोचना मुंबईत मोठ्या झाल्या. मन्ना डे यांनी सुलोचनाला पहिल्यांदा पाहताच त्यांच्या प्रेमात पडले.

पुढे दोघांमध्ये बोलणे होऊ लागले. हे बोलणे भेटीत बदलले आणि नंतर दोघांनाही एकमेकांवर इतके प्रेम झाले की, विभक्त होण्याचा विचारदेखील त्यांना भीतीदायक वाटू लागला. सुलोचना कुमारन यांना मन्ना डे प्रेमाने सुलू म्हणायचे. ते त्यांच्या सुलूवर इतके प्रेम करायचे की, त्यांच्याशिवाय त्यांचे कोणतेही काम होत नव्हते.

‘कोणती बंगाली मुलगी नाही मिळाली का?’
सुलोचनाशी लग्न करण्याच्या संदर्भात, मन्ना डेचे वडील त्यांना म्हणाले, “कोणती बंगाली मुलगी नाही मिळाली का?” वडिलांच्या अशा बोलण्यावर मन्ना डे म्हणाले, “बंगाली बंगाली काय करत असता? ती काय बंगालीपेक्षा कमी नाही. ती अतिशय उत्तम रवींद्र संगीत गाते.”

हे ऐकून आश्चर्यचकित होऊन त्यांचे वडील म्हणाले, “अच्छा, रवींद्र संगीत गाते. कुठून शिकली आहे?” यावर मन्ना डे म्हणाले, “हो गाते ती, कुठूनही शिकली असुद्या, पण मला ती मुलगी आवडते. तिलाही मी आवडतो, मग तुम्ही का मध्ये अडचण बनून येत आहात.” बराच वेळ त्यांच्यात वाद चालूच राहिला. मात्र, आईचा होकार त्यांना मिळाला. यानंतर १८ डिसेंबर, १९५३ रोजी, मन्ना डे यांनी आईच्या आशीर्वादाने सुलोचनासोबत लग्न केले. लग्नानंतर या जोडप्याला दोन मुली झाल्या.

मन्ना डे पत्नी सुलोचना यांना त्यांची प्रेरणा मानत असत. कोणतीही चांगली- वाईट परिस्थिती या जोडप्याला एकमेकांपासून विभक्त करू शकत नव्हती. केवळ मृत्यूच असे माध्यम बनले, ज्यामुळे मन्ना डे त्यांच्या पत्नीपासून वेगळे झाले. २०१२ मध्ये सुलोचना हे जग सोडून गेल्या आणि त्यानंतर एक वर्षानंतरच म्हणजेच २०१३ मध्ये मन्ना डे यांनीही जगाला निरोप दिला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘भारतात समस्या…मात्र दुबईत मी सुरक्षित’ जीवे मारण्याच्या धमक्यावर सलमान खानने सोडले मौन

पहिलाच चित्रपट ठरला हिट, तर पुढे तिन्ही खानसोबत काम करायची मिळवली तिने सुवर्णसंधी; वाचा अनुष्का शर्माचा यशस्वी जीवनप्रवास

हे देखील वाचा