महानायक अमिताभ बच्चन हे चित्रपटसृष्टीचे लोकप्रिय अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी सिनसृष्टीत यशाचे शिखर गाठले आहे. मात्र अभिषेक बच्चनला अभिनयात विशेष छाप पाडता आली नाही. परंतु आता वाढदिवसादिनी आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
अभिनेता अभिषेक बच्चन आज( 05 फेब्रुवारी) आपला 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर अभिषेकला अनेक शुभेच्छा मिळत असताना अभिषेकने आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे अभिषेकने आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
अमिताभ बच्चन यांचे सुपुत्र अभिषेक बच्चनला सिनेसृष्टीत काम मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. घरात अभिनयाचा वारसा असतानाही अभिषेक बच्चन मात्र सिनसृष्टीत विशेष छाप पाडता आली नाही. आपल्या 22 वर्षाच्या अभिनय कारकिर्दीत त्याने अनेक चित्रपटात काम केले आहे. आता लवकरच तो नवीन ‘घुमर’ चित्रपटात दिसणार आहे. आज वाढदिवसाच्यादिनीच अभिषेक बच्चनने आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन अभिषेकने या बद्दलची माहिती चाहत्यांशी शेअर केली आहे. यामध्ये ‘घुमर’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करत असल्याचा फोटो दिसत आहे. या फोटोसोबत अभिषेकने “वाढदिवसानिमित्त यापेक्षा सुंदर गिफ्ट असूच शकत नाही, वाढदिवस आनंदात साजरा होतोय आता घुमर येतोय” असा कॅप्शन दिला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर बाल्की करत आहेत. अभिषेक बच्चनने याआधी आर बाल्की यांच्या ‘पा’ चित्रपटात काम केले होते. यामध्ये अमिताभ यांनीही भूमिका साकारली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चनच्या मुलाची भूमिका साकारली होती जो एका भयानक रोगाला बळी पडतो ज्यामुळे वय वाढलेले दिसत असते.
दरम्यान यावर्षी अभिषेक बच्चनचा ‘दसवी’ चित्रपटही प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केले असून अभिषेक बच्चनसोबत अभिनेत्री निमरत कौर काम करणार आहे. सोबतच अभिषेक बच्चनचा एक तामिळ चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा :