Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘माहिती नव्हतं मी किती दिवस जगेल…’, जेव्हा मरणातून थोडक्यात बचावला होता नवाजुद्दीन सिद्दीकी

नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आपल्या अभिनयाने प्रत्येक पात्रात जीव ओततो. जेव्हा जेव्हा तो पडद्यावर येतो, तेव्हा प्रेक्षकांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असतात. त्याने आपल्या मेहनतीने असे स्थान मिळवले आहे की, मोठ्या स्टार्स आणि दिग्दर्शकांनाही त्याच्यासोबत काम करावेसे वाटते. पण एक वेळ अशी होती, जेव्हा त्याच्याकडे काम नव्हते. त्याच्याकडे खायलाही पैसे नसल्याची, बिकट स्थितीही त्याने पाहिली आहे. नीट न खाल्ल्याने तो अशक्त झाला होता. एकदा तर त्याला वाटले की, आपण मरणार आहोत.

खाण्यासाठी करायचा काम
दिलेल्या एका मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या संघर्षाचे दिवस आठवले. तो म्हणाला, “मी नेहमीच कष्टकरी आणि मजुरांप्रमाणे निसर्गाशी लढत आलो आहे. मला वाटत नाही की, मी त्याच्यापेक्षा अधिक काही आहे. माझाही हेतू तसाच होता. मी स्टार होण्याचे स्वप्नही पाहिले नव्हते. उदरनिर्वाह करायचा आणि खाण्याइतके कमवायचे, एवढाच माझा हेतू होता. हे तब्बल १० वर्षे चालले.” (nawazuddin siddiqui did not have food to eat says i felt as if i am going to die soon)

 ‘मी खूप कठीण काळातून गेलो आहे’
नवाजुद्दीन सिद्दीकीकडे पैसे नसल्यामुळे तो जेवणासाठी मित्रांच्या घरी जायचा. तो म्हणाला, “मी विचित्र नोकऱ्या करायचो आणि मित्रांच्या घरी जेवणासाठी जायचो. तो काळ खूप कठीण होता, पण तरीही आम्ही खूप आनंदी होतो. पण हो, त्यावेळी काम न मिळाल्याने खूप ताण जाणवायचा. जेव्हा तुमची स्वप्ने मोठी होतात, तेव्हा नैराश्य आणि निराशा सुरू होते.

‘असे वाटायचे जसे मी मरणार आहे’
नवाजुद्दीन सिद्दीकीने पुढे सांगितले की, “जेवण नीट न केल्यामुळे मी खूप अशक्त झालो होतो. माझे केसही गळायला लागले होते. दोन किलोमीटर चालल्यावर लगेच मला थकवा यायचा. त्या वेळी मला वाटले की, मी मरणारच आहे. त्यामुळे बाहेरचे जग पाहण्यासाठी मी दिवसभर घराबाहेर फिरायचो, कारण किती दिवस जगणार आहे हे मला माहीत नव्हते.”

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

“मला चित्रपटात काम करायचे नव्हते तसे करायचे असते तर….” मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने केला होता करियरबद्दल खुलासा

आईच्या भूमिकेतील रीमा लागू यांचा दमदार अभिनय पाहून इनसिक्योर झाल्या होत्या श्रीदेवी, उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

हे देखील वाचा