Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘केसरी’पासून ते ‘रुस्तम’पर्यंत अक्षय कुमारने सत्य घटनांवर आधारित ‘या’ चित्रपटात साकारल्या अस्सल भूमिका

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय. अक्षयचा बॉलिवूडमध्ये एक वेगळाच दरारा आहे. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ऍक्शन चित्रपटांपासून केली, पण हळूहळू त्याने बॉलिवूडच्या अनेक स्टाईलमध्ये स्वतःला दाखवले. ऍक्शन चित्रपटात हिरो कॉमेडी करू शकत नाहीत. मात्र, बॉलिवूडची ही धारणा त्याने मोडीत काढली.त्याचबरोबर, गेल्या काही वर्षांपासून त्याचा कल आता खऱ्या आयुष्यातील कथांवर जास्त दिसत आहे. तो गेल्या काही काळापासून बायोपिक चित्रपटांमध्ये काम करत आहे.

जर तुम्ही अलीकडच्या काळात त्याची फिल्मोग्राफी बघितली तर तुम्हाला कळेल की, तो विशेष शैलीचे चित्रपट करून, त्याच्या पात्रांवर संशोधन करून आणि अनेक विषयांची सांगड घालून उत्तम चित्रपट कसा बनवत आहे. अक्षय गुरुवारी (९ सप्टेंबर) त्याचा ५४वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने त्याच्या अशा चित्रपटांची यादी पाहूया, ज्यात त्याने पडद्यावर वास्तविक जीवनाशी संबंधित पात्र साकारले आहे.

बेलबॉटम
गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला अक्षय कुमार चित्रपट ‘बेलबाॅटम’ २४ ऑगस्ट १९८४ रोजी दिल्लीहून उड्डाण केलेल्या इंडियन एयरलाईन्सच्या फ्लाइट IC ६९१ च्या भोवती फिरतो. या चित्रपटाने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. चित्रपटात इंदिरा गांधी म्हणून लारा दत्ताचे ट्रान्सफॉर्मेशनेच सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यानंतर, चित्रपटातील अक्षयचे पात्र भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या प्रेरणेतून तयार झाले आहे.

केसरी
केसरी सारागढ़ीच्या लढाईवर आधारित ‘केसरी’ हा चित्रपट ब्रिटिश भारतीय लष्कराच्या २१ शीख सैनिकांच्या विलक्षण शौर्याच्या सत्य कथेवर आधारित आहे. हे युद्ध २१ शीख सैनिक आणि १०००० अफगाण यांच्यात लढले गेले होते. या चित्रपटात अक्षयने ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश आणि अफगाण सीमेवर गुलिस्तान किल्ल्यावर तैनात ब्रिटिश इंडियन आर्मीच्या शीख रेजिमेंटचा हवालदार इशर सिंग यांची भूमिका केली होती.

गोल्ड
‘गोल्ड: द ड्रीम दॅट युनायटेड अवर नेशन’ हा रीमा कागती लिखित आणि दिग्दर्शित एक ऐतिहासिक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. हा १९४८ च्या उन्हाळी ऑलिंपिकमधील भारताच्या पहिल्या राष्ट्रीय हॉकी संघाच्या प्रवासावर आधारित आहे. तसेच अक्षय तपन दासच्या भूमिकेत आहे, ज्याने १९४८च्या उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. चित्रपटाची कथा प्रख्यात भारतीय हॉकीपटू किशन लाल यांच्या जीवनावर आधारित आहे.

पॅडमॅन
‘पॅडमॅन’ हा चित्रपट तमिळनाडूतील सामाजिक उद्योजक अरुणाचलम मुरुगानंथम यांच्या जीवनावर आधारित आहे. त्याची कथा ट्विंकल खन्नाने याआधी तिच्या ‘द लीजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद’ या पुस्तकात सांगितली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर. बाल्की यांनी केले होते. तसेच चित्रपटात राधिका आपटे आणि सोनम कपूर मुख्य भूमिकेत होत्या.

रुस्तम
मांडर के. एम. नानावटी विरुद्ध महाराष्ट्र राज्य १९५९ चे भारतीय न्यायालयीन प्रकरण होते, ज्यात कमांडर कावास मानेकशॉ नानावटी, एक नौदल कमांडर, यांच्यावर त्यांच्या पत्नीच्या प्रियकराच्या हत्येचा खटला चालवण्यात आला होता.

कमांडर नानावटी यांना सुरुवातीला ज्युरीने दोषी ठरवले नाही, परंतु मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल रद्द केला आणि खटल्याची सुनावणी पुन्हा सुरू झाली. या चित्रपटातील अक्षय कुमारच्या पात्राचे नाव रुस्तम पावरीचे होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एका लहान मुलाच्या सांगण्यावरून घेतली मॉडेलिंगमध्ये उडी, जाणून घ्या अक्षय कुमारचा चित्रपट प्रवास

-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’

-नेहा कक्कर आहे गरोदर? ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देणार गोड बातमी

हे देखील वाचा