रणवीर सिंग याने बॉलिवूडमधील ‘पॉवरहाऊस’ अभिनेता म्हणून स्वत:ची आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. २०१०मध्ये बॉलिवूड पदार्पण करणारा रणवीर बुधवारी (दि. ०६ जुलै) ३७ वर्षांचा झाला. त्याचा जन्म ६ जुलै, १९८५ मध्ये मुंबईत झाला होता. आता रणवीरला ओळखत नाही, कदाचित असा एकही व्यक्ती भेटणार नाही. रणवीरने काळानुसार आपल्या अभिनयात सुधारणा केली आणि आज तो बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत जाऊन बसलाय. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याविषयी माहिती नसलेल्या १० गोष्टी…
माध्यमांतील वृत्तानुसार, रणवीर सिंग (Ranveer Singh) हा त्याच्या बालपणी खूपच जाड होता. वयाच्या १६व्या वर्षापासून त्याने फिटनेसवर लक्ष देण्यास सुरुवात केली होती. रणवीर बॉलिवूडच्या फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या मते, योग्य आहार, योग्य झोप आणि जबरदस्त मेहनत हेच फिटनेसचे मंत्र आहेत.
View this post on Instagram
रणवीरमध्ये एनर्जी ठासून भरल्याचे आपल्याला वेळोवेळी दिसते. तो आपल्या प्रत्येक सिनेमासाठी वेगवेगळा आहार घेतो. त्याने स्वत:च सांगितले आहे की, सिनेमात ज्याप्रकारची भूमिका असते, त्याप्रकारचा आहार तो घेतो.
View this post on Instagram
रणवीरच्या मते, त्याची बॉडी ‘इंडोमॉर्फ’ (ज्यांच्या शरीरातील चरबी त्यांच्या स्नायूंपेक्षा जास्त असते असे लोक) प्रकारची आहे. त्यामुळे वजन खूप वेगाने वाढते. दुसरीकडे, वजन कमी करणे खूप कठीण असते.
View this post on Instagram
‘बँड बाजा बारात’ या २०१० साली आलेल्या सिनेमातून रणवीरने बॉलिवूड पदार्पण केले होते. सिनेमासाठी त्याने ‘बीच बॉडी’ बनवली होती. कपडे परिधान करून साधाभोळा दिसणारा रणवीर जेव्हा टीशर्ट काढतो, तेव्हा तो जबरदस्त दिसतो. अशाप्रकारची बॉडी बनवण्यासाठी त्याने ३ महिने कठोर मेहनत घेतली होती.
View this post on Instagram
रणवीरला जेव्हा ‘बँड बाजा बारात’ या सिनेमाची ऑफर मिळाली, तेव्हा अशी अफवा पसरली होती की, या सिनेमासाठी रणवीरच्या वडिलांनी आदित्य चोप्राला १० कोटी रुपये दिले होते. तरीही, रणवीरकडून याचे खंडन केले गेले होते.
View this post on Instagram
आईचा लाडका म्हणला जाणारा रणवीर सिंगच्या वडिलांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. त्याची आई गृहिणी आहे आणि ‘लुटेरा’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याने आपल्या आईला लक्झरी कार भेट म्हणून दिली होती.
View this post on Instagram
इतकेच नाही, तर रणवीर आपल्या एकुलती एक बहीण रितिकावर खूप प्रेम करतो. तो प्रत्येक वर्षी राखी बांधून घेतल्यानंतर तिच्या पाया पडतो. इतकेच नाही, तर राखी जोपर्यंत स्वत:च तुटत नाही, तोपर्यंत तो ती हातात तशीच ठेवतो.
View this post on Instagram
View this post on Instagram
रणवीर सिंग हा नात्याने सोनम कपूर हिचा भाऊ आहे. सोनमची आई सुनीता कपूर आणि रणवीरचे वडील जगजीत सिंग भवनानी भावंडं आहेत. अशाप्रकारे रणवीर आणि अनिल कपूर नातेवाईक आहेत.
View this post on Instagram
दीपिका पदुकोणचा पती रणवीर सिंग जेव्हा लहान होता, तेव्हा त्याला माधुरी दीक्षित, सोनाली बेंद्रे आणि रवीना टंडन या अभिनेत्री खूप आवडायच्या.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बघायला गेला आवडत्या अभिनेत्याला, पण पिवळ्या साडीतील रवीनाच बसली मनात; मग सेटवरून झाली हाकालपट्टी
सुरुवातीला खाल्ला खस्ता, पण मेहनतीच्या जोरावर बनला ‘एनर्जेटिक’ अभिनेता, वर्षाला छापतो ‘इतके’ कोटी