अभिनेत्री अमृता रावने आपल्या सौंदर्याने आणि आपल्या अदाकारीने अनेक चाहत्यांना वेड लावले आहे. अमृताने रुपेरी पडद्यावर उत्कृष्ट भूमिका साकारल्या, ज्या आजही लोकांच्या आठवणीत आहेत. अशातच तिने नुकतेच एका गोष्टीचाही खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वीच तिने सांगितले होते की, दिवंगत चित्रकार एमएफ हुसेन यांनी तिला आणि तिच्या आईला दुबईत थेट चित्रकलेसाठी आमंत्रित केले होते. मात्र, ते खऱ्या जीवनातील अमृता आणि ‘विवाह’ या चित्रपटातील अमृता या दोघींच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करत होते. अमृताने असेही उघड केले की, हुसेन यांनी तिला त्यांचे ‘सिग्नेचर’ पेंटब्रशही भेट म्हणून दिले होते.
अमृता रावने साल २००६ मध्ये ‘विवाह’ या रोमँटिक चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील तिच्या अभिनयाने एमएफ हुसेन यांना खूप प्रभावित केले होते. सूरज बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटात शाहिद कपूर तिच्यासोबत मुख्य भूमिकेत होता. काही वर्षांपूर्वी अमृताने एक व्हिडिओही शेअर केला होता. ज्यात एमएफ हुसेन यांनी तिची चित्रे बनवली होती.
नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान एमएफ हुसेन यांच्याबद्दल बोलताना अमृता म्हणाली की, “हुसैन साहेबांनी मला आणि माझ्या आईला दुबईत पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. मी लाईव्ह पेंट करावं अशी त्यांची इच्छा होती. आमच्या प्रवासाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी माझ्या आईसमोर कबूल केले की, सुरुवातीला मला वैयक्तिकरीत्या भेटण्यास संकोच वाटला. ते विचार करत होते की, जर विवाह चित्रपटातील अमृता खरी नसेल, तर त्यांचा भ्रमनिरास होईल.”
अमृता म्हणाली की, “त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितले होते की, ‘मी तिच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे.” अमृता पुढे असेही म्हणाली की, “जेव्हा त्यांनी मला त्यांची स्वाक्षरी केलेला ब्रश भेट दिला, तेव्हा ते म्हणाले होते, ‘लक्षात ठेव की जगात फक्त ३ लोकच याच्या मालक आहेत.’”
MF HUSSAIN LIVE PAINTED AMRITA RAO ON HIS CANVAS.https://t.co/fFgHhL0CNo#mfhussain #painter #muse #exclusivevideo pic.twitter.com/zJNZCI69Tb
— AMRITA RAO ???????? (@AmritaRao) June 12, 2017
अमृताने सांगितले की, “मला आठवते की जेव्हा मी हुसेन साहेबांना पहिल्यांदा भेटले होते, तेव्हा ते दुबई विमानतळावर आमचे स्वागत करायला आले होते. मी त्यांना अनवाणी पायाने लांब काळ्या रंगाचा ब्रश धरून चालताना पाहिले ही होते. त्याचबरोबर त्यांच्यासोबत सिग्नेचर काठीच्या रुपात शेवटपर्यंत वापरली होती. शेवटच्या दिवशी जेव्हा त्यांनी मला तो ब्रश भेट म्हणून दिला, तेव्हा मी हादरले आणि माझ्या डोळ्यात पाणी आले.”
एमएफ हुसेन एकदा म्हणाले होते की, माधुरी दीक्षितनंतर अमृता राव हा एकमेव चेहरा होता जो त्यांना उत्साहित करत होता. “हे माझ्या सर्वात चांगल्या कौतुकांपैकी एक आहे”, असेही याबाबत बोलताना अमृता म्हणाली होती.
अमृताने आतापर्यंत ‘मैं हूं ना’, ‘इश्क विश्क’, ‘अब के बरस’, ‘ठाकरे’, ‘वाह! लाईफ हो तो ऐसी’, ‘मस्ती’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा