अभिनेत्री अर्चना पूरन सिंग यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांनी टीव्ही शोमध्येही आपले नशीब आजमावले. सध्या त्या ‘द कपिल शर्मा शो’ च्या परीक्षक आहेत. शिवाय त्यांनी अनेक कॉमेडी शोमध्ये परीक्षक म्हणून काम केले आहे. त्यांनी १०० पेक्षा जास्त चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. त्या प्रथम टीव्ही रिऍलिटी शो ‘कॉमेडी सर्कस’ मध्ये परीक्षक म्हणून दिसल्या आणि तेव्हापासून त्यांनी या शोच्या अनेक सीझनचे परीक्षण केले. आजकाल त्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये नवज्योत सिंग सिद्धूच्या जागी दिसत आहे. असेच आज या लेखात अर्चना पूरन सिंगच्या संपूर्ण जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.
अर्चना पूरन सिंग यांचा आज म्हणजेच २६ सप्टेंबर रोजी वाढदिवस असून, त्या ५९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म देहरादूनमध्ये झाला होता. त्यांना हे यश गाठण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. अनेक वेळा त्यांना अपयश देखील पत्करावे लागले होते. (Birthday special! Actress Archana Puran Singh secretly married her husband Parmeet)
अर्चना यांनी ‘अभिषेक’ या चित्रपटाद्वारे मनोरंजन विश्वात पदार्पण केले. त्याच वर्षी त्या नसीरुद्दीन शाह यांच्या विरूद्ध ‘जलवा’ या चित्रपटात देखील दिसल्या. याशिवाय त्यांनी ‘अग्निपथ’, ‘सौदागर’, ‘शोला और शबनम’, ‘आशिक आवारा’, ‘राजा हिंदुस्तानी’ आणि ‘बाझ’ यांसारख्या चित्रपटात ही केले. चित्रपटांमध्ये अर्चना यांनी छोट्याश्या भूमिका साकारल्या होत्या, मात्र त्यांच्या या भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या. याच्या व्यतिरिक्त, अर्चनाला ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटात मिस ब्रिगांझा म्हणून चाहत्यांनी पसंती दर्शवली होती.
अर्चना १९९३ मध्ये टीव्ही शो ‘वाह क्या सीन है’ मध्ये दिसल्या होत्या. यासोबतच त्या ‘श्रीमान श्रीमती’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसल्या, जी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. याशिवाय त्यांनी ‘जाने भी दो पारो’ आणि ‘नेहले पे देहला’ सारख्या शोचे दिग्दर्शनही केले आहे. याच्या व्यतिरिक्त अर्चना एक उत्तम परीक्षक देखील आहे. पती परमीत सेठीसोबत अर्चना यांनी ‘झलक दिखला जा’ आणि ‘कहो ना यार है’ यासह अनेक शो होस्ट केले आहेत.
अर्चना यांनी छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या भूमिका खूप गाजवल्या. तसेच त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत होत्या. अर्चना यांनी परमीत सेठीसोबत दुसरे लग्न केले. अर्चना यांचे पहिले लग्न यशस्वी ठरले नाही. त्यानंतर अर्चना यांनी पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला. मग चित्रपटसृष्टीत आल्यानंतर अर्चना आणि परमीत यांची भेट झाली. त्यानंतर हळूहळू त्यांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
इतकेच नव्हे तर ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये देखील राहिले होते. त्यानंतर त्यांनी ३० जून १९९२ मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाचा किस्सा अर्चनाचा पती परमीत यांने ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये सांगितला होता. ते म्हणाले की, “आम्ही रात्री ११ वाजता एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आम्ही थेट पंडितजींना शोधायला गेलो. रात्री १२ च्या सुमारास आम्ही पंडितजींना भेटलो. त्यांनी आम्हाला विचारले की, आम्ही पळून जाऊन लग्न करत आहोत का? मग पंडित जी म्हणाले की, लग्न असे होणार नाही, अगोदर मुहूर्त पाहावा लागेल, त्यानंतर लग्न लावले जाईल. आम्ही त्यांना त्याच रात्री पैसे दिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता आम्ही लग्न केले.”
त्याच्या व्यतिरिक्त अर्चना यांनी सांगितले होते की, पती परमीत सेठीच्या आई- वडिलांना हे लग्न मान्य नव्हते. अर्चना एक अभिनेत्री असल्याने त्यांना त्या आवडत नसायच्या. त्यामुळे त्यांनी या लग्नाला नकार दिला होता. मात्र परमीतने ठाम निश्चय केला आणि घराच्यांच्या विरोधात जाऊन त्याने अर्चनाशी लग्न केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोघांनी जवळजवळ चार वर्षे त्यांचे लग्न सर्वांपासून लपवून ठेवले.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध
-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज