सिद्धार्थ नाही तर ‘हे’ आहे मितालीचे पहिले प्रेम, पाहा कशी पडली अभिनेत्याच्या प्रेमात

0
260
Photo Courtesy: Instagram/mitalimayekar

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्री आहेत, पण काही अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. याच यादीतील एक नाव म्हणजे अभिनेत्री मिताली मयेकर. (Mitali mayekar) उत्कृष्ट संवाद कौशल्य, देहबोली, आणि वेगवेगळ्या भूमिका साकारून तिने मराठी इंडस्ट्रीमध्ये तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. चित्रपट, मालिका, नाटक आणि वेबसीरिज या सगळ्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यासोबत सोशल मीडियावर देखील तिचा कमालीचा वावर असतो. सोशल मीडियावर तिची तगडी फॅन फॉलोविंग असल्यामुळे चाहते देखील तिच्याबाबत जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. शुक्रवारी (११ सप्टेंबर) मिताली तिचा २६ वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया तिच्याबाबत संपूर्ण माहिती.

View this post on Instagram

A post shared by Mitali Mayekar Chandekar ???? (@mitalimayekar)

मिताली मयेकरचा जन्म ११ सप्टेंबर १९९६ रोजी मुंबई येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिच्या वडिलांचे नाव उदय मयेकर आणि आईचे नाव सुजाता मयेकर आहे. एकुलती एक मुलगी असल्याने अगदी लाडा-प्रेमात तिच्या आई-वडिलांनी तिचे संगोपन केले आहे. मुंबईमधील बालमोहन विद्यामंदिर या शाळेमध्ये तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाले आहे. तसेच मुंबईमधील रुईया कॉलेजमधून तिने मास मीडियाची पदवी संपादन केली आहे. (mitali mayekar celebrat her 26 th birthday, let’s know about her)

View this post on Instagram

A post shared by Mitali Mayekar Chandekar ???? (@mitalimayekar)

मितालीने २००८ साली ‘असंभव’ या मालिकेत बालकलाकार म्हणून काम केले आहे. या मालिकेनंतर तिच्यातील अभिनयाचे कौशल्य समोर आले होते. यानंतर २००९ साली तिला बॉलिवूडमधून बालकलाकार म्हणून ऑफर आली. तिने ‘बिल्लू बारबर’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिने अभिनेता इरफान खानसोबत काम केले आहे. चित्रपटात तिने इरफान खानच्या मुलीची भूमिका साकारली होती. मितालीने २०१५ ‘उर्फी’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर २०१६ मध्ये तिला ‘यारी दोस्ती’ या चित्रपटातून ऑफर आली. या चित्रपटातील तिची राणी नावाची भूमिका सर्वांना खूप आवडली होती. यानंतर २०१९ साली तिने ‘आम्ही बेफिकर’ आणि ‘स्माईल प्लिज’ या चित्रपटात काम केले. तसेच २०२१ साली ती ‘हॅशटॅग प्रेम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

चित्रपटासोबत तिने अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. तिने ‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘उंच माझा झोका’, ‘तू माझा सांगाती’, ‘फ्रेशर्स’, ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ती ‘महाराष्ट्राची फेव्हरेट डान्सर’ या रियॅलिटी शोमध्ये स्पर्धक होती. तिने ‘सेक्स ड्रग्स अँड थिएटर’ या वेबसिरीजमध्ये देखील काम केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Mitali Mayekar Chandekar ???? (@mitalimayekar)

मिताली मयेकर ही २०१७ पासून अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याच्याशी डेट करत होती. ते दोघे लिव्हिंग रिलेशनमध्ये राहत होते. त्या दोघांनी २०१९ मध्ये साखरपुडा केला होता. तसेच त्यांनी २४ जानेवारी २०२१ साली त्यांनी देव ब्राह्मणाच्या साक्षीने सप्तपदी चालून लग्न केले आहे. मुळशीमधील ढेपेवाड्यात थाटामाटात त्यांचा लग्न सोहळा पार पडला होता. त्यांच्या लग्नाला अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. पारंपरिक पद्धतीने त्यांनी लग्न केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Mitali Mayekar Chandekar ???? (@mitalimayekar)

मिताली आणि सिद्धार्थ यांच्यातील केमिस्ट्री सगळ्यांना खूप आवडते. त्या दोघांनी ‘हौस हसबंड’ या ऑडिओ बुकसाठी रेकॉर्डिंग केले आहे. त्या दोघांमधील प्रेम, मस्ती त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. एका मुलाखतीमध्ये मिताली मयेकरने तिच्या पहिल्या प्रेमाबाबत खुलासा केला होता. तिने सांगितले होते की, “सिद्धार्थ हे माझे दुसरे प्रेम आहे. माझे पहिले प्रेम माझी झोप आहे. मी माझ्या झोपेवर प्रचंड प्रेम करते.” यावर सिद्धार्थ देखील म्हणाला होता की, “झोप जर एखादी व्यक्ती असती तर मितालीने त्याच्याशीच लग्न केले असते. ती कितीही वेळ झोपू शकते.”

View this post on Instagram

A post shared by Mitali Mayekar Chandekar ???? (@mitalimayekar)

 

सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्न आधीपासूनच त्यांच्या रिलेशनबाबत खूप चर्चा रंगल्या होत्या. सर्वत्र त्यांचे फोटो आणि व्हिडिओ होत होते. सिद्धार्थने त्याच्या एका मुलाखतीत त्याच्या रिलेशनबाबत जेव्हा त्याच्या आईला समजले तेव्हा तिची काय प्रतिक्रिया होती हे सांगतले होते. त्याने सांगितले की, “आई सोशल मीडियापासून दूर असल्याने तिला आमच्या नात्याबाबत काही कल्पना नव्हती. पण एक दिवस मी तिला मितालीचा फोटो पाठवला. यावर तिने मला ‘ही कोण आहे” असे विचारले. मी तिला म्हणालो की, कशी आहे? यावर तिने केवळ हमम असा रिप्लाय दिला. यावर मी पण हमम असं म्हणालो. यावरून ती समजून गेली की, मिताली कोण आहे. ”

View this post on Instagram

A post shared by Mitali Mayekar Chandekar ???? (@mitalimayekar)

यानंतर त्याने सांगितले की, “आईला भेटवण्याआधी मी मितालीला चहा बनवायला शिकवला कारण माझी आई टी लव्हर आहे. तिला जर चहा आवडला तर ती इंप्रेस होणार हे मला माहित होते.” मिताली ही निसर्गप्रेमी अभिनेत्री आहे. तिला फिरायला खूप आवडते. तसेच तिला प्राण्यांबद्दल खूप प्रेम आहे. ती डॉग लव्हर आहे. यासोबत तिला टॅटू देखील खूप आवडतात. तिच्या बॉडीवर एकूण सात टॅटू आहेत तसेच ती हॅरीपॉटरची खूप मोठी फॅन आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘आमच्याकडे मांजरी आणि कुत्री आहेत’, कधीही आई न होण्याच्या निर्णयावर कविता कौशिकने सोडले मौन
जेलमधून बाहेर येताच कमाल खान पुन्हा खवळला, ट्विट करत म्हणाला ‘मी आता …’
राजनीकांतची पत्नी बनून लाइमलाईटमध्ये आलेली श्रिया सरन, ‘त्या’ बोल्ड ड्रेसमुळे मागावी लागलेली माफी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here