Wednesday, July 3, 2024

यशस्वी दिग्दर्शक होण्याआधी सुरज बडजात्या करायचे ‘हे’ काम, अनुपम खेर यांनी केला खुलासा

बॉलिवूडमधील अतिशय प्रतिभावान आणि सर्जनशील अभिनेता म्हणून नेहमीच अनुपम खेर यांचे नाव घेतले जाते. अनुपम खेर यांनी विविधांगी भूमिका साकारून त्यांच्यात असणाऱ्या एका उत्कृष्ट अभिनेत्याला जगासमोर सादर केले. आज अनुपम खेर हे अभिनयातील जणू एक विद्यापीठच बनले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमातून अनुपम खेर यांनी उत्कृष्ट भूमिका साकारून सर्वांचीच वाहवा मिळवली. काश्मीर पंडितांवर ९० च्या दशकात झालेल्या अत्याचारावर आधारित असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कामगिरी केली. या सिनेमाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता ते लवकरच सूरज बडजात्या यांच्या ‘उंचाई’ सिनेमात दिसणार आहे.

या सिनेमाच्या सेट वरून नुकताच अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी त्यांच्या आणि सूरज बडजात्या यांच्या काही आठवणी देखील लोकांना सांगितल्या आहेत. आज सूरज बडजात्या हे इंडस्ट्रीमधील मोठे आणि यशस्वी दिग्दर्शक, निर्माते म्हणून ओळखले जातात मात्र याआधी ते काय काम करायचे याचा खुलासा अनुपम खेर यांनी या पोस्टमधून केला आहे.

सलमान खानाला बॉलिवूडमध्ये एक नवीन ओळख आणि यशस्वी अभिनेता किंबहुना सुपरस्टार म्हणून सेट करण्यामध्ये सूरज बडजात्या यांचा मोठा वाटा आहे. आज सूरज कौटुंबिक सिनेमे बनवण्यामध्ये आणि ते यशस्वी करण्यासाठी ओळखले जातात. मात्र आज जरी ते एक यशस्वी निर्माते म्हणून ओळखले गेले जात असले तरी हे यश मिळ्वण्याआधी संघर्षाच्या दिवसांमध्ये त्यांनी सहायक आणि क्लॅप बॉय म्हणून काम केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम खेर यांनी ‘उंचाई’ सिनेमाच्या सेटवरचा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “माझ्या पहिल्या सिनेमाच्या ‘सारांश’च्या शूटिंग दरम्यान सूरज बडजात्या हे एक क्लॅप बॉय आणि सहायक म्हणून काम करायचे. आता जेव्हा ते मॅग्नम ओपस ‘उंचाई’ सिनेमाचे दिग्दर्शक करत आहे तर मला त्यांच्यास्तही सेटवर क्लॅप बॉय म्हणून काम करताना मजा आली. यासोबतच मी सेटवर काही मजा मस्ती देखील करत होतो, मात्र माझी कॉमेडी त्याच्या (सूरज बडजात्या) यांच्या लक्षात आलीच नाही कारण ते त्यांच्या कामात खूपच जास्त गुंतलेले होते.”

अनुपम खेर यांच्या या पोस्टवर त्याच्या फॅन्सने देखील एका पेक्षा एक भारी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “सर तुमचा सेन्स ऑफ ह्यूमर खूपच छान आहे.”, अजून एक म्हणतो, “सर तुम्ही खूपच मजेशीर आहात.” तर अजून एक लिहितो, “काय सर कसे भारी आहात.” तत्पूर्वी अनुपम खेर यांनी १९८४ साली आलेल्या महेश भट्ट यांच्या ‘सारांश’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमात त्यांनी एका निवृत्त शिक्षणाची भूमिका साकारली होती. या सिनेमाचे निर्माते सूरज बडजात्या यांचे आजोबा ताराचंद बडजात्या होते. अनुपम खेर यांनी सूरज बडजात्या यांच्यासोबत ‘हम आपके हैं कौन..!’, ‘विवाह’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘उंचाई’ आदी चित्रपटांमध्ये काम केले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘…तुम्हाला त्याचा राग येता कामा नये’ गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन लोकांना दाखवला आरसा

अनवाणी पायांनी ऑस्कर पुरस्कारासाठी रवाना झाला राम चरण, काय आहे कारण? घ्या जाणून…

हे देखील वाचा