Friday, May 24, 2024

अभिनेत्री नव्हे, तर ‘या’ क्षेत्रात हिना खानला कमवायचे होते नाव, मात्र ‘अशी’ पदरात पडली ‘अक्षरा’ची भुमिका

‘ये रिश्ता क्या केहलाता है’ या मालिकेमधून अक्षरा नावाने प्रसिद्धी मिळवलेल्या हिना खानने सर्व रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिच्या या मालिकेमधील अभिनयाने सर्व सासू आणि सूना तिच्यावर फिदा झाल्या होत्या. कारण ही मालिका कौटुंबिक होती. हिनाचा जन्म 2 ऑक्टोबर 1987रोजी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे झाला. 

पत्रकारितेमध्ये करायचे होते करिअर
अभिनेत्री शिक्षणासाठी श्रीनगरवरुन दिल्लीला आली होती. तिच्या मनामध्ये पत्रकारिता करण्याची इच्छा होती. परंतु नशिबात काही दुसरेच लिहिले होते. हिनाने गुडगाव येथून एमबीएची पदवी संपादन केली. त्यांनतर तिने हवाई सुंदरी व्हायचे ठरवले आणि ती मुंबईला रवाना झाली. तिने त्याचे शिक्षण घेण्यास देखील सुरुवात केली, परंतु नियतीच्या मनात तिने हवाई सुंदरी व्हावे हे नव्हते. (Birthday special asha Parekh you know some interesting things related to actress career)

पहिल्याच ऑडिशनमध्ये मिळाली मुख्य भूमिका
अभिनेत्रीला अभिनयामध्ये फारसा रस नव्हता. एक दिवस ती सहजच आपल्या मित्रांबरोबर ‘ये रिश्ता क्या केहलाता है’च्या सेटवर पोहचली होती. तिथे पहिल्याच ऑडिशनमध्ये तिच्या पारड्यात मुख्य अभिनेत्रीची भूमिका पडली. अशा पद्धतीने हिनाच्या दमदार अभिनयाला सुरुवात झाली.

हिनाने या आधी साल 2008 मध्ये ‘इंडियन आयडल’मध्ये स्वतःचे नशीब आजमावले होते. ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ या मालिकेने तिला घराघरात पोहचवले. तब्बल 7 वर्षे तिने यामध्ये काम केले. अभिनेत्रीने ‘कयामत’, ‘कर्म अपना अपना’, ‘कुमकुम- एक प्यारा सा बंधन’, ‘सबकी लाडली बेबो’, ‘कस्तुरी’, ‘राजा की आयेगी बारात’, ‘परफेक्ट ब्राईड’, ‘ससुराल गेंदा फूल’, ‘ये हे मोहब्बते’ यासह अनेक मालिकांना आपल्या अभिनयाने चार चाँद लावले आहेत.

हिनाने ‘खतरों के खिलाडी’मध्ये देखील सहभाग घेतला होता. यामध्ये आल्यानंतर आजवर पाहिलेली शांत स्वभावाची अक्षरा म्हणजेच हिना रसिक प्रेक्षकांना रावडी अंदाजामध्ये पाहायला मिळाली. प्रेक्षकांचे तिने यामध्ये देखील खूप मनोरंजन केले.

‘बिग बॉस’च्या 11 व्या पर्वात देखील ती झळकली होती. या शोमधून तिचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना दिसला.

हेही नक्की वाचा-
उर्फी जावेदचा अतरंगी अवतार पाहून तुमचंही डोकं गरगरेल; युजर म्हणाले, ‘मी रात्री…’
‘अरे…’ म्हणत दबंग गर्लने शेअर केला ‘तसला’ फोटो; चाहतेही झाले आऊट ऑफ कंट्रोल

हे देखील वाचा