Thursday, June 13, 2024

उर्फी जावेदचा अतरंगी अवतार पाहून तुमचंही डोकं गरगरेल; युजर म्हणाले, ‘मी रात्री…’

टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद नेहमीच आपल्या वेगळ्या आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिचा एक नवीन लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उर्फीने यावेळी एक असा ड्रेस घातला आहे ज्याबद्दल तुम्ही विचार देखील करू शकत नाही. तिने केलेला मेकअप देखील खूपच वेगळा आणि बोल्ड आहे.

उर्फीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. उर्फीने या ड्रेससोबत खूपच बोल्ड मेकअप केला आहे. तिने आपल्या चेहऱ्यावर भारी मेकअप केला आहे आणि तिने केस मोकळे सोडले आहेत. उर्फीचा हा नवीन लूक पाहून तिचे चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या लूकची प्रशंसा केली आहे. काही लोकांना तिचा हा लूक आवडलेला नाही.

उर्फी जावेद सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच चर्चेत असतात. उर्फी जावेदच्या नवीन लूकवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी तिच्या लूकची प्रशंसा केली आहे. काही लोकांनी तिला बोल्ड आणि ग्लैमरस म्हटले आहे. तर काही लोकांनी तिच्या लूकवर टीका केली आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है ‘ फेम अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. क्लिपमध्ये अभिनेत्री धक्कादायक लूकमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना उर्फी जावेदने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मला माझ्या आत असलेल्या सैतानला बाहेर काढायचे आहे.” क्लिपमध्ये उर्फी जावेद आतापर्यंतच्या सर्वात अनोख्या लूकमध्ये दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी जावेदचा हा लूक पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत . काहीजण व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हनुमान चालिसाचे पठण करतानाही दिसले. एका यूजरने लिहिले की, ‘आता मी रात्री झोपू शकणार नाही.’ दुलऱ्याने लिहिले की, ‘मी शपथ घेतो की, तू खूप वाईट दिसत आहेस.’ तर आणखी एक म्हणाला की, अंडरवर्ल्डची अप्सरा.’ उर्फीच्या या व्हिडीओला अवघ्या दोन तासांमध्ये 50 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. (Actress Urfi Javed video in Atrangi avatar goes viral)

आधिक वाचा-
‘सिंघम अगेन’च्या सेटवरून फोटो लीक! रणवीर सिंगचा ‘तो’ फोटो पाहून चाहते खल्लास
सुरभी ज्योतीची ‘ही’ स्टाईल तुम्ही या आधी कधी पाहिली आहे का? पाहा फोटो

हे देखील वाचा