Wednesday, March 29, 2023

भरगोस पुरस्कारांच्या मानकरी आहेत आशा पारेख; तर आमिर खानच्या काकांमुळे आयुष्यभर राहिल्या अविवाहित

भारतीय सिनेसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या आशा पारेख रविवारी (२ ऑक्टोबर) त्यांचा वाढदिवस साजरा करतात. त्यांनी 60 ते 70 च्या दशकामध्ये बॉलिवूडमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांचा जन्म मुंबईमध्ये 2 ऑक्टोबर 1942 रोजी झाला. ‘आसमान’, ‘धोबी डॉक्टर’ पासून ते ‘घर की इज्जत’, ‘आंदोलन’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार अभिनय केला. बालपणीच त्यांना त्यांच्या आईने नृत्याचे धडे गिरवन्यास मदत केली होती.

आशा पारेख यांच्या आई मुस्लिम समाजाच्या होत्या, तर वडील बच्चुभाई पारेख गुजराती समजाचे होते. त्यांच्या आईने यांना पंडित बन्सीलाल यांच्याकडे नृत्याचे क्लासेस लावले होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या मनात अभिनयाची खुमखुमी होती. (Birthday special asha Parekh you know some interesting things related to actress marriage and love life)

वयाच्या दहाव्या वर्षी केला अभिनय
आशा यांना लहानपणापासून अभिनयाची गोडी होती अशात त्यांना बिमल रॉय दिग्दर्शित ‘मॉं’ या चित्रपटामध्ये बालकलाकाराची भूमिका मिळाली. अवघ्या 10 वर्षांच्या असताना देखील त्यांचा अभिनय आणि चेहऱ्यावरील हावभाव अगदी विलक्षणीय होते. त्यावेळी त्यांनी ‘आसमान’, ‘धोबी डॉक्टर बाप बेटी, ‘श्री चैतन्य महाप्रभू’, ‘उस्ताद’ या चित्रपटांमध्ये बालकलाकाराची भूमिका साकारली होती.

‘या’ चित्रपटातून मिळाली खरी ओळख
साल १९५२ मध्येच बालकलाकार म्हणून त्यांनी अभिनयास प्रारंभ केला होता. त्यानंतर त्यांनी सलग आठ चित्रपटांमध्ये अभिनय केला आणि बालकलाकाराची भूमिका साकारली. अशात साल १९५९ मध्ये ‘दिल दे के देखो’ या चित्रपटामध्ये त्यांनी शम्मी कपूर यांच्या बरोबर मुख्य भूमिकेत अभिनय केला. त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या चित्रपटामधून त्यांना आणि त्यांच्या अभिनयाला खरी ओळख मिळाली. त्यांनतर त्यांच्या अभिनयातील कारकिर्दीने हळू हळू यशाचे शिखर गाठले. त्यांनी ‘कटी पतंग’, ‘आन मिलो सजना’, ‘घराना’, ‘भरोसा’, ‘मेरे सनम’, ‘तीसरी मंजिल’, ‘दो बदन’, ‘उपकार’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘हम तो चले परदेस’, ‘प्यार का मौसम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले. बालपणापासून नृत्याचे शिक्षण घेतले असल्याने, त्यांनी परदेशामध्ये देखील उत्तम स्टेज परफॉर्मन्स केला होता.

भरगोस पुरस्कारांच्या आहेत मानकरी
आशा पारेख यांनी त्यांच्या अभिनयाने त्या काळात प्रेक्षकांना भुरळ घातली होती. त्यावेळी त्या नंबर वनच्या अभिनेत्री होत्या. आतापर्यंत त्यांनी एकूण ३० पुरस्कारांवर स्वतःचे नाव कोरले आहे. साल १९६३ मध्ये त्यांना ‘अखंड सौभाग्यवती’साठी गुजरात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या. साल २०२० मध्ये ग्लोबल सिनेमा फेस्टिवल लाइफ टाइम अचीव्हमेंटच्या पुरस्कारावर देखील त्यांनी स्वतःचे नाव कोरले.

‘अभिनेत्री सारखी खास गोष्ट नाही तुझ्यामध्ये’
चित्रपट निर्माते विजय भट्ट यांच्याशी आशा यांची एकदा भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी म्हटलेले शब्द ऐकून तुम्ही चकित व्हाल. ते म्हणाले होते की,”अभिनेत्री सारखी तुझ्यात काहीच खास गोष्ट नाही.” असे म्हणत विजय यांनी आशा यांना चित्रपटांमध्ये न घेण्याचे कारण सांगितले होते.

विवाहित पुरुषाच्या होत्या प्रेमात
दिग्दर्शक नासिर हुसैन यांनी आशा यांच्यामधील अभिनयाची आवड पहिल्या भेटीमध्येच ओळखली होती. त्यांना विश्वास होता की, आशा यशस्वी चित्रपट देऊ शकतात. नासिर हुसैन हे अभिनेता आमिर खानचे काका आहेत. त्या काळी आशा आणि नासिर यांच्या प्रेमाची चर्चा देखील रंगली होती. परंतु या दोघांनी कधीही लग्न केले नाही. आशा यांचे असे म्हणणे होते की, त्या नासिर यांच्या कुटुंबियांना त्रास देऊ इच्छित नाहीत. परंतु त्यांचे प्रेम खरे होते. त्यामुळे त्यांनी आयुष्यभर अविवाहित राहणे पसंत केले.

समाजसेवेची देखील आहे आवड
आशा पारेख यांनी गरजू आणि गरिबांना आजवर खूप मदत केली आहे. त्यांनी एका बाळाला दत्तक घेण्याचा देखील विचार केला होता. परंतु वडिलांच्या विरोधामुळे ते होऊ शकले नाही. बीसीजे हॉस्पिटल आणि आशा पारेख रिसर्च सेंटर देखील त्यांनी सुरू केले आहे. इथे गरजू आणि गरिबांना उपचार दिले जातात.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडमध्ये तयार झाले गांधीजींच्या विचारांचं दर्शन घडविणारे चित्रपट, एकावर तर पाकिस्तानने घातली होती बंदी

-‘मला खुश राहायचंय’, म्हणत घराच्या छतावर पावसाळी वातावरणाचा आनंद लुटताना दिसली ‘स्वीटू’

-लग्नाच्या पहिल्या रात्रीच अक्षय कुमारला समजलं होतं पत्नी ट्विंकलचं ‘हे’ सत्य, अभिनेत्याने सर्वांसमोर केला खुलासा

हे देखील वाचा