भगवान जगन्नाथ यांची सध्या रथयात्रा सुरु आहे. याच दरम्यान भगवान जगन्नाथांच्या भक्तांसाठी आणि चित्रपटप्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ‘महाप्रभू जगन्नाथ’ हा ॲनिमेटेड चित्रपट प्रदर्शीत होणार होता मात्र त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, सध्या सुरू असलेल्या भव्य भगवान जगन्नाथ रथयात्रेदरम्यान हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ शकत नाही. मात्र, चित्रपट निर्मात्यांना दिलासा देत, न्यायालयाने वार्षिक उत्सव संपल्यानंतर, म्हणजेच 28 जुलै रोजी किंवा त्यानंतर हा चित्रपट रिलीज होउ शकतो.
‘महाप्रभू जगन्नाथ’ हा चित्रपट खरेतर शुक्रवार, 17 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. फक्त एकदिवस आधी 16 जुलै रोजी दिल्लीत चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते मात्र चित्रपटासंबंधी वाद वाढल्याने तारखेत बदल करण्यात आला होता. ओरिसा उच्च न्यायालयाने आपल्या अंतरिम आदेशात म्हटले होते की, चित्रपटातील भगवान जगन्नाथांच्या चित्रणाबाबत उपस्थित केलेल्या आक्षेपांची सार्वजनिक प्रदर्शनापूर्वी सखोल न्यायालयीन चौकशी होणे आवश्यक आहे. तर चित्रपटांच्या निर्मात्यांनी या स्थगिती हटवण्यासंबधी अपील केले आहे.
निर्मात्यांनी अपील केल्यावर, न्यायालयाने हे प्रकरण गुरुवारऐवजी शुक्रवारसाठी सूचीबद्ध केले आणि रथयात्रेनंतरपर्यंत चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खुप आतुर झाले आहे. तर श्रीपाद (shree)वारखेडकर दिग्दर्शित आणि एली ॲनिमेशन्स निर्मित या चित्रपटाच्या नवीन प्रदर्शनाच्या तारखेबाबत निर्माते लवकरच अधिकृत घोषणा करतील अशी अपेक्षा आहे.
विकी कौशलने कतरिना कैफच्या बर्थडे निमित्त शेअर केली खास पोस्ट










