Saturday, July 27, 2024

‘मिल्खा सिंग’ची भूमिका साकारून बनला टॉप क्लास अभिनेता, वाचा अष्टपैलू कलाकार फरहान अख्तरबद्दल

चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांकडे अनेक प्रकारच्या प्रतिभा आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने तज्ञ आहे. खूप कमी कलाकार आहेत, ज्यांनी या क्षेत्रात हात आजमावला आणि त्यात यश मिळवले. बॉलिवूडचा लेखक, दिग्दर्शक, निर्माता, गायक आणि आता अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) हा अशाच काही प्रतिभावंतांपैकी एक आहे. त्याला बॉलिवूडचा  कलाकार म्हटले, तर वावगे ठरणार नाही. फरहानने कोणत्याही क्षेत्रात हात आजमावण्याचे ठरवले त्यात तो यशस्वी ठरला आहे. तो साेमवारी (9 जानेवारी) त्याचा 49वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया.

फरहानचा जन्म 9 जानेवारी 1974रोजी मुंबईत झाला. फरहानचे वडील जावेद अख्तर (Javed Akhtar) हे इंडस्ट्रीतील दिग्गज आहेत आणि आई हनी इराणी अभिनेत्री आणि पटकथा लेखक आहेत. फरहानला लहानपणापासूनच असे वातावरण मिळाले, जिथे सगळीकडे लेखन आणि सिनेमाची चर्चा होती. त्याच्या वडिलांची गणना आजही उत्तम लेखकांमध्ये केली जाते. फरहानने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि नंतर स्वतःचे प्रोडक्शन हाऊस उघडले आणि नंतर दिग्दर्शन केले. यानंतर अभिनय क्षेत्रात आल्यावर येथेही यश संपादन केले.

फरहानने 1991 मध्‍ये ‘लम्हे’ आणि 1997 मध्‍ये ‘हिमालय पुत्र’मधून करिअरची सुरुवात केली. इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी त्याला वेळ लागला. वडिलांचे इतके नाव असूनही फरहानने आपल्या मेहनतीने हे स्थान मिळवले आहे. 1990 मध्ये त्याने रितेश सिधवानीसोबत ‘एक्सेल एंटरटेनमेंट’ ही स्वतःची निर्मिती कंपनी सुरू केली. यानंतर त्याने ‘दिल चाहता है’ या पहिल्या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या यशानंतर ‘लक्ष्य’ या वॉर चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा चित्रपट आजही सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत गणला जातो.

दिग्दर्शनानंतर अभिनयाचीही यशस्वी कारकीर्द
यानंतर त्याने शाहरुख खानच्या ‘डॉन’चे दिग्दर्शनही केले. त्याचे जवळपास सर्वच चित्रपट हिट ठरले. फरहानने ‘फकीर ऑफ व्हेनिस’मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. परंतु हा चित्रपट उशिरा प्रदर्शित झाला आणि त्याचा अधिकृत पदार्पण चित्रपट अभिषेक कपूरचा ‘रॉक ऑन’ मानला जातो. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. या चित्रपटातही त्याने अनेक गाणी गायली आहेत. या चित्रपटातून त्याच्यातील पार्श्वगायकाला बाहेर येण्याची संधी दिली.

मिल्खा सिंगची भूमिका साकारून बनला टॉप क्लास अभिनेता
त्यानंतर त्याने बहिण जोया अख्तरचा ‘लक बाय चान्स’ हा चित्रपट केला. त्यानंतर ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘दिल धडकने दो’, ‘शादी के साइड इफेक्ट्स’, ‘वजीर’, ‘लखनौ सेंट्रल’ आणि ‘द स्काय इज पिंक’, ‘तुफान’ या चित्रपटांमध्ये काम केले. त्याचा सर्वोत्कृष्ट अभिनय ‘भाग मिल्खा भाग’ मध्ये होता. हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. प्रत्येक काम चोखपणे केल्यामुळे त्याने प्रत्येक क्षेत्रात यश मिळवले आहे.(birthday special bollywood all rounder artist farhan akhtar made gold the genre he touched)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता राव ! फराह खान आणि तिच्या नवऱ्यात आहे 8 वर्षांचं अंतर, 16 वर्षापूर्वी शाहरूखने केलंय कन्यादान

विमानतळावर गीता कपूरने ‘मम्मी’ म्हटल्यामुळे फराह खानचा झाला होता अपमान; शोमध्ये सांगितले किस्सा

हे देखील वाचा