असे म्हणतात की प्रेम आंधळं असतं आणि त्यात सर्व काही माफ असतं. प्रेम हे कुणाचं वय पाहून केलं जात नाही. असेच काहीसे बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्यासोबत घडले. जेव्हा ते बॉलिवूड अभिनेत्री प्राची देसाईच्या प्रेमात पडला होता, मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित आणि प्राचीचे नाते फार काळ टिकले नाही.
छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर दिसणारी प्राची देसाई आणि चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी हे दोघे एकेकाळी आकंठ प्रेमात बुडाले होते. त्यांच्यात इतक प्रेम होतं की, दिग्दर्शक तिच्याशी लग्न करणार होता. अशा अफवा बॉलिवूडमध्ये रंगू लागल्या. मात्र, दोघांनीही त्यांच्या डेटींगबद्दल काहीही सांगितले नव्हते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार 2012 मध्ये जेव्हा रोहित शेट्टीचा ‘बोल बच्चन’ चित्रपट आला होता, त्याचवेळी प्राची देसाईच्या डायरेक्टरसोबत डेटींगच्या बातम्या समोर आल्या होत्या. ‘बोल बच्चन’ चित्रपटाच्या सेटवर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे बोलले जात होते. एक काळ असा होता की, रोहित शेट्टी प्राचीसोबत राहू लागला होता. जयपूरमध्ये शूटिंगदरम्यान दोघेही रोमँटिक डिनर करताना दिसले होते. प्राचीसोबतच्या अफेअरमुळे रोहित शेट्टीचे लग्न तुटण्याच्या मार्गावर होते, पण तसे झाले नाही.
मात्र, प्राची आणि रोहित शेट्टीचे मार्ग लवकरच वेगळे झाले आणि दोघांनीही एकमेकांपासून दुरावले. रोहित आणि प्राचीच्या या प्रेमकहाणीने बरीच चर्चा झाली. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर प्राची बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये नक्कीच दिसली, पण तिला जे स्टारडम मिळायला हवे होते ते मिळवता आले नाही.
प्राची अलीकडेच फॉरेंसिक’ चित्रपटात दिसली होती. याआधी प्राचीने 2008 मध्ये ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून बॉलिवूड प्रवासाला सुरुवात केली होती. ‘लाइफ पार्टनर (2009)’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई (2010)’, ‘बोल बच्चन (2012)’ आणि ‘मी, मी और में (2013)’ असे काही चित्रपटात काम केल आहे. प्राची ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’मध्ये अभिनेता इमरान हाश्मीसोबत दिसली होती, हाच चित्रपट होता ज्याने प्राचीचे करिअर पुढे नेले. या एकाच चित्रपटासाठी त्यांना 6 पुरस्कार देण्यात आले. (bollywood-director-rohit-shetty-love-in-actress-prachi-desai)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘झूठा’ गाण्याच्या प्रदर्शनावेळी जोरजोरात रडली राखी सावंत म्हणाली, ‘मी संसाराची स्वप्न नाही पाहू शकत का?’
जय हो..! कोट्यवधी भारतीयांना गुडन्यूज, आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला मिळाला मानाचा ऑस्कर पुरस्कार