बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची पत्नी गौरी खान रविवारी (८ऑक्टोबर) आपला वाढदिवस साजरा करत आहे. गौरी शुक्रवारी ५३ वर्षांची झाली आहे. ती इंटरनॅशनल इंटीरियर आणि फॅशन डिझायनर आहे. शाहरुख आणि गौरी हे बॉलिवूडमधील सर्वात पॉवर कपल आहेत. या बॉलिवूड पॉवर कपल प्रेमामध्ये पडण्यापासून लग्न करण्यापर्यंतच्या या रोमांचक आणि आव्हानात्मक प्रवासाच्या अनेक कथा आहेत. इंडस्ट्रीमध्ये गौरीचे फ्रेंड सर्कलही खूप चांगले आहे. २०१८ मध्ये फॉर्च्यून इंडिया मॅगझीनच्या पॉवरफूल महिलांच्या टॉप ५० यादीत आपले स्थान मिळवले आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या व्यावसायिक आघाडीबद्दल जाणून घेऊया.
दिल्लीमध्ये पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या गौरीचे शिक्षण दिल्लीच्या टॉप स्कूल-कॉलेजमध्ये झाले आहे. गौरीने दिल्ली विद्यापीठाच्या प्रतिष्ठित कॉलेज लेडी श्री राम कॉलेजमधून पदवी घेतली आहे. शाहरुखची कारकिर्द घडवण्यासाठी गौरीने खूप मदत केली आहे. मुलांच्या संगोपनाबरोबरच तिने आपले करिअरही घडवले. गौरी एक यशस्वी व्यावसायिक महिला आहे. शाहरुखने आपल्या अनेक मुलाखतींमध्ये म्हटले आहे की, गौरीचे त्याच्या यशात मोठे योगदान आहे.
गौरी खान एक प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे. गौरीने केवळ तिचा बंगला ‘मन्नत’च सजवला नाही, तर तिच्या कौशल्याने अनेक बॉलिवूड कलाकारांची घरे सजवली आहेत. बर्याच लोकांचे सिंपल ऑफिस देखील आतील बाजूने सुंदर बनवले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, गौरीने स्वतःहून सुमारे १६०० कोटींची संपत्ती कमवली आहे.
गौरी खान केवळ इंटिरिअर डिझायनर नाही, तर तिचे स्वतःचे फ्लॅगशिप स्टोअर जुहू या मुंबईच्या पॉश भागात आहे. जिथे रॉबर्टो कॅवल्ली आणि रॉल्फ लॉरेन सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सना होमवेअर ॲक्सेंट आहेत. याशिवाय, ती रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊसची सह-संस्थापक अर्थात सह-निर्माता देखील आहे. तिने तिच्या होम प्रॉडक्शन बॅनरखाली ‘मैं हूं ना’, ‘ओम शांती ओम’, ‘माय नेम इज खान’, ‘हॅपी न्यू इयर’, ‘चेन्नई एक्सप्रेस’ असे अनेक सुपरहिट चित्रपट प्रोड्यूस केले आहेत.
शाहरुख आणि गौरीच्या प्रेमकथेबद्दल बोलायचे झाले तर, दोघांच्या प्रेम आणि लग्नापर्यंतच्या रोमांचक आणि आव्हानात्मक प्रवासाच्या अनेक कथा आहेत. शाहरुख आणि गौरी दोघेही शाळेच्या दिवसांपासून एकमेकांवर खूप प्रेम करायचे. दोघेही वर्षानुवर्षे एकमेकांना डेट करत होते, मग शेवटी दोघांनीही आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगितले.
शाहरुख मुस्लिम आणि गौरी हिंदू असल्यामुळे गौरीच्या कुटुंबीयांना हे नाते मान्य नव्हते. दोघांचे एकमेकांवर इतके प्रेम होते की, शाहरुखने गौरीच्या आई -वडिलांना इंप्रेस करण्यासाठी पाच वर्षे हिंदू असल्याचे भासवले. शाहरुख गौरीसाठी खूप पझेसिव्ह होता. इतके की त्याला गौरी इतर कोणाशी बोलणे देखील आवडत नव्हते. शाहरुखने गौरीला तिचे केस मोकळे सोडण्यासही नेहमीच मनाई केली.
एक वेळ अशी आली जेव्हा गौरी या सर्व गोष्टींमुळे खूप वैतागली होती. मग गौरीने त्याच्याशी संबंध तोडले, पण नंतर शाहरुखने तिला समजवण्यासाठी मुंबई गाठली. मग गौरीने शाहरुखला माफ केले आणि दोघांनी २५ ऑक्टोबर १९९१ रोजी लग्न केले. आज या जोडप्याला आर्यन, सुहाना आणि अब्राम अशी तीन मुले आहेत.
हेही नक्की वाचा-
–‘पैसे वाया गेल्याच्या दुःखापेक्षा भूक लागलेली असताना…’, मुक्ता बर्वेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
–विसकटलेले केस, अस्वस्थ चेहरा; जान्हवी कपूरचा फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘तुला काय…’