शाहरुख खानच्या जवान या चित्रपटात नयनताराच्या भूमिकेबद्दल अभिनेत्री दिग्दर्शक ऍटली यांच्यावर नाराज असल्याच्या बातम्या सध्या येत आहेत. शुक्रवारी ट्विटरवर आस्क मी एनीथिंग सेशनदरम्यान एका चाहत्याने विचारलेल्या या प्रश्नावर किंग खानने आपले मत व्यक्त केले. बॉक्स ऑफिसवर जवानच्या बंपर यशाचा आनंद लुटताना, अभिनेत्याने पुन्हा एकदा चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यामध्ये एका उत्तराने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. हा प्रश्न अॅटलीच्या जवान या चित्रपटातील नयनताराच्या भूमिकेबद्दल होता.
विशेष म्हणजे जवानमध्ये शाहरुख खानने आझाद आणि विक्रम राठोड यांच्या बाप-मुलाची भूमिका साकारली होती. तर नयनतारा नर्मदा, जी सिंगल मदर आणि आझादच्या प्रेमाची भूमिका साकारत होती. तर दीपिका पदुकोण आझादचे वडील विक्रम राठोड यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.
I also felt that the story of Narmada as a single mom was amazing. Unfortunately in the scheme of things couldn’t find more screen time but as is was also wonderful. #Jawan https://t.co/QStZVAOMxC
— Shah Rukh Khan (@iamsrk) September 22, 2023
शाहरुख खान आणि नयनतारा मुख्य भूमिकेत असणारा जवान हा चित्रपट सगळ्यांच्या पसंतीस उतरत आहे. त्यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील खूप चांगला गल्ला कमावला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
Bigg Boss 17: या अटीवर अभिषेक मल्हान शोमध्ये सहभागी होणार? YouTuber चाहत्यांसाठी दिली बातमी
दृष्टीहीन मुलींच्या ढोलवादनाने अभिनेत्री झीनत अमान भारावल्या; बॉलिवूड सेलिब्रिटींच्या हस्ते गौरी-गणपतीची महाआरती