Thursday, November 14, 2024
Home बॉलीवूड कधी नकारात्मक तर कधी सकारात्मक भूमिका साकारून अरुणोदय सिंगने बनवली प्रेक्षकांच्या मनात खास जागा, वाचा

कधी नकारात्मक तर कधी सकारात्मक भूमिका साकारून अरुणोदय सिंगने बनवली प्रेक्षकांच्या मनात खास जागा, वाचा

अभिनेता अरुणोदयने बॉलिवूडमध्ये खूप कमी कालावधीत त्याची एक वेगळी छाप पाडली आहे. कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक भूमिका साकारून त्याने त्याचे इंडस्ट्रीमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अरुणोदय सिंग हा राजकारणी कुटुंबातून येतो. परंतु त्यांना नेहमीच बॉलिवूडचे हे झगमगत जग आवडत होते. म्हणून त्याने त्याचे करीअर देखील बॉलिवूडमध्ये करण्याचा निर्णय घेतला. अशातच गुरुवारी(१७ फेब्रुवारी) तो त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया त्याच्याबाबत काही खास गोष्टी…

 

View this post on Instagram

 

A post shared by Arunoday Singh (@sufisoul)

अरुणोदय सिंग यांचा जन्म १७ फेब्रुवारी १९८३ रोजी झाला. आज तो त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने अगदी लहान असतानाच ठरवले होते की, तो चित्रपटसृष्टीत त्याचे करीअर करणार आहे. न्यूयॉर्क फिल्म ऍकॅडमीमध्ये काही कोर्स केल्यानंतर त्याने नाटकात भाग घेण्यास सुरुवात केली. तसेच त्याने अनेक बॉलिवूड चित्रपटासाठी ऑडिशन देखील दिले. (Arunoday singh celebrate his birthday ; let’s know about his career)

त्याने २००९ साली ‘सिकंदर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अनेक चित्रपटात त्याने सुंदर भूमिका निभावल्या आहेत. परंतु कुठे ना कुठे तो अंडरटेकर राहिला आहे. चांगला अभिनय करून देखील त्याला त्याची ओळख मिळाली नाही. त्याची खासियत म्हणजे तो ज्या चित्रपटात काम करणार असतो तो आधी त्या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचतो आणि मगच त्या चित्रपटात काम करायचे की नाही हे ठरवतो. चला तर जाणून घेऊया त्याच्या काही वेबसीरिज आणि चित्रपटांबद्दल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arunoday Singh (@sufisoul)

जिस्म २ : ‘जिस्म २’ या चित्रपटात अरुणोदय सनी लिओनीसोबत दिसला होता. या चित्रपटात त्याने आयान ठाकूर ही भूमिका निभावली होती. या चित्रपटात रणदीप हुड्डा देखील महत्वाच्या भूमिकेत होता.

मैं तेरा हिरो – या चित्रपटात वरुण धवन, इलियाना डिक्रुझ, नर्गिस फकरी हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटात अरुणोदयने नकारात्मक भूमिका निभावली होती. या चित्रपटात त्याने अंगद बेदी ही भूमिका साकारली होती. या चित्रपटाने प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन केले होते

मोहनजोदाडे – आशुतोष गोवारीकरच्या मोहनजोदाडो या चित्रपटात अरुणोदयने मुंजा हे पात्र निभावले होते. या चित्रपटात ॠतिक रोशन आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत होते. अरुणोदय या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत होता.

अपहरण – ‘अपहरण – सबका कटेगा’ मधून अरुणोदयने डिजिटल पदार्पण केले होते. ही वेबसीरिज अल्ट बालाजीवर प्रीमियर झाली होती. या वेबसीरिजचे दिग्दर्शन सिद्धार्थ सेन गुप्ताने केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आदिल तुरुंगात जाताच राखी अन् शर्लिनची पुन्हा झाली मैत्री, पाहा व्हायरल व्हिडिओ
भांड फुटलं रे! स्वरा भास्करने केले समाजवादी पक्षाच्या ‘फहाद अहमद’साेबत लग्न, पाहा व्हिडिओ

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा