Tuesday, May 21, 2024

करीना कपूरसोबत केली होती अभिनयाची सुरुवात, तर ‘असा’ होता तुषार कपूरच्या कारकिर्दीचा आलेख

चित्रपटात कारकीर्द यशस्वी करण्यासाठी या क्षेत्रातून कोणत्या तरी बड्या व्यक्तीचा पाठिंबा मिळायला हवा, असे म्हटले जाते. अशातच स्टारकिडला तर चित्रपट मिळवण्यासाठी जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही. मात्र याला अपवाद असेही काही स्टारकिड आहेत, ज्यांचे घराणे अभिनय क्षेत्रात सक्रिय असूनही त्यांना या ठिकाणी चांगली कामगिरी करता आली नाही. यातच एक नाव येते अभिनेता तुषार कपूरचे.

तुषार कपूर (Tusshar Kapoor) हा दिग्गज अभिनेते जितेंद्र यांचा मुलगा आहे. तर त्याची आई शोभा कपूर या टेलिव्हिजन इंडस्ट्रीच्या निर्मात्या असून, त्या चित्रपट आणि वेब सीरिजची निर्मिती करतात. शिवाय त्याची बहीण एकता कपूरही निर्माती असून दिग्दर्शनही करते. अशातच अभिनेता तुषार कपूर रविवारी(20 नोव्हेंबर) त्याचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने 2001 मध्ये बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. मात्र मुख्य अभिनेता म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करण्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. आज तुषारच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी सांगत आहोत. (birthday special know about tusshar kapoor bollywood career and where is he now)

पहिलाच चित्रपट ठरला यशस्वी
तुषारने त्याच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात ‘मुझे कुछ कहना है’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात तुषारसोबत करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसली होती. तुषारचा पहिलाच चित्रपट हिट ठरला. या चित्रपटासाठी त्याला पदार्पणाच्या फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले होते. त्यानंतर तुषार अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, ऐश्वर्या राय बच्चन आणि अजय देवगण यांच्यासोबत ‘खाकी’मध्ये दिसला होता. या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर तो अनेक चित्रपटांमध्ये दिसला, पण ते चित्रपट हिट ठरले नाहीत.

अडल्ट कॉमेडीमध्ये ठेवले पाऊल
त्यानंतर तुषारने कॉमेडी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्याने 2005 मध्ये रितेश देशमुखसोबत ‘क्या कूल हैं हम’ या चित्रपटात काम केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर तो रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल’ या चित्रपटात दिसला. यानंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला.

साकारली गुंडाची भूमिका
तुषारने 2007 मध्ये एक पात्र साकारले होते, ज्यासाठी त्याचे खूप कौतुक झाले होते. ‘शूटआउट ऍट लोखंडवाला’ या चित्रपटात तुषारने गँगस्टरची भूमिका साकारली होती. जी चांगलीच पसंत केली होती. त्यानंतर तो पुन्हा एकदा ‘शूटआउट ऍट वडाळा’मध्ये गँगस्टरच्या भूमिकेत दिसला.

बऱ्याच काळांनंतर केले पुनरागमन
तुषारने बराच काळ मोठ्या पडद्यापासून स्वतःला दूर केले होते, त्यानंतर तो 2017 मध्ये ‘गोलमाल अगेन’मध्ये लकीच्या भूमिकेत दिसला. त्यानंतर तो रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपटातील ‘आंख मारे’ या गाण्यातही दिसला होता.

नसिरुद्दीन शाहसोबत करणार काम
तुषारने यावर्षी पुनरागमनाची घोषणा केली आहे. तो नसीरुद्दीन शाहसोबत ‘मारीछ’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनयासोबतच तुषार त्याची निर्मितीही करणार आहे. (birthday special know about tusshar kapoor bollywood career and where is he now)

हेही वाचा
राज कपूरसाेबतच्या अफेअरवर झीनत अमानने ताेडले माैन; म्हणाल्या, ‘देव आनंदला असं वाटलं…’
बादशाहला नव्हते बनायचे गायक?, म्हणाला, ‘आतापर्यंत चुकीच्या ठिकाणी होतो…’

हे देखील वाचा