अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या दिव्या अग्रवालने अगदी कमी कालावधीत इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. रियॅलिटी शोमधून इंडस्ट्रीत दाखल झालेली दिव्या अग्रवाल सध्या तरुणांच्या गळ्यातील ताईत बनत चालली आहे. दिव्या शनिवारी तिचा २९ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म ४ डिसेंबर १९९२ साली मुंबईत झाला होता. दिव्या ही ट्रेन डान्सर असून, तिने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी कोरिओग्राफी देखील केली आहे. आज दिव्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी…
एमटीव्हीच्या ‘स्प्लिट्सविला’ या शोमध्ये दिव्याने एंट्री केली. हा शो ती जिंकू शकली नाही, पण या शोने दिव्याला ओळख दिली. यानंतर, दिव्या एमटीव्हीच्या ‘एस ऑफ स्पेस’ या शोमध्ये दिसली आणि हा शो तिने जिंकला. या शोनंतर दिव्याने सर्वांची मने जिंकली होती. यातील तिची खेळण्याची स्टाईल सर्वांनाच आवडली. (birthday special know intresting facts about reality show queen divya agarwal)
बनली ‘बिग बॉस ओटीटी’ची विजेता
दिव्या अलीकडेच ‘बिग बॉस’ या रियॅलिटी शोच्या पहिल्या ओटीटी व्हर्जनमध्ये सहभागी झाली होती. हा शो ६ आठवडे चालला. जो वूटवर प्रसारित झाला. या शोची विजेती दिव्या ठरली. शोमध्ये तिला चाहत्यांचा खूप पाठिंबा मिळाला. या शोची ट्रॉफी घेऊन ती घराबाहेर पडली होती.
शो केले आहेत होस्ट
दिव्या अग्रवाल ही रियॅलिटी शोची क्वीन आहे. ती अनेक रियॅलिटी शोजचा भाग बनली आहे आणि काही शो होस्ट देखील केले आहेत. तिने तिचा प्रियकर वरुण सूदसोबत ‘रोडीज रियल हीरोज’ होस्ट केला. यासोबतच या दोघांनी मिळून ‘एस ऑफ स्पेस क्वारंटीन’चे आयोजनही केले होते.
दिव्या अग्रवाल कामासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. तिने अगोदर प्रियांक शर्माला डेट केले. प्रियांक आणि दिव्या ‘स्प्लिटविला’पासूनच एकमेकांना पसंत करू लागले होते. दोघेही शोच्या बाहेर अनेकदा एकत्र दिसले होते. त्यानंतर प्रियांक ‘बिग बॉस’चा भाग बनला. शोमध्ये गेल्यानंतर दिव्याचे अभिनेत्यासोबत ब्रेकअप झाले. प्रियांकला डेट केल्यानंतर दिव्या आता वरुण सूदसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अनेक वर्षांपूर्वीच झाली होती ‘ओमिक्रॉन व्हेरिएंट’ची भविष्यवाणी! व्हायरल होतोय चित्रपटाचा पोस्टर