Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

विसाव्या वर्षी साकारला ८० वर्षांचा म्हातारा, दिलीप साहेबांवरील प्रेमाखातर मनोज यांनी बदलले स्वत:चे नाव

मनोरंजनाच्या जगात काही कलाकार असे आहेत, ज्यांच्याबद्दल असे म्हणता येईल, ‘बस नाम ही काफी है.’ ज्यांनी त्यांच्या नावावर सिनेमे सुपरहिट करून दाखवले आहे. आजच्या घडीला असे कलाकार खूपच मोजके आहेत. मात्र, त्यांनी प्रत्येक सिनेमा स्वबळावर हिट करून दाखवला. असे एक महान कलाकार म्हणजे मनोज कुमार. हिंदी चित्रपटसृष्टीतील कोणत्याही ठराविक परिचयाची गरज नसणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार. मनोज कुमार यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक संस्मरणीय सिनेमे प्रेक्षकांना दिले. बहुतकरून देशभक्तीपर चित्रपटांमुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. त्यांच्या याच चित्रपटांमुळे त्यांना भारत कुमार असे देखील संबोधले जाते. सोमवारी (दि. २४ जुलै) मनोज कुमार त्यांच्या वयाची ८५ वर्षे पूर्ण करत आहेत. याच निमित्ताने त्यांच्या जीवनावर टाकलेला हा प्रकाश.

मनोज कुमार (Manoj Kumar) यांचा जन्म २४ जुलै, १९३७मध्ये पूर्वीच्या पाकिस्तानातील करनाल येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला आहे. त्यांचे खरे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी असे आहे. फाळणीनंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब भारतात आले. भारतात आल्यानंतर मनोज कुमार यांनी दिल्लीच्या हिंदु कॉलेजमधून त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते मुंबईत आले. (Birthday special know manoj kumar movie journey)

लहानपणापासून मनोज कुमार यांना चित्रपट बघण्याचा खूप छंद होता. त्यांना दिलीप कुमार खूप आवडायचे. दिलीप कुमार आणि अशोक कुमार यांचे चित्रपट पाहायला त्यांना खूप आवडायचे. एक दिवस ते त्यांच्या मित्रांसोबत सिनेमा पाहायला गेले. त्या सिनेमाचे नाव होते ‘शबनम’. यामध्ये दिलीप कुमार यांच्या भूमिकेचे नाव होते मनोज कुमार. याच भूमिकेवरून प्रेरित होऊन त्यांनी त्यांचे खरे नाव बदलून मनोज कुमार असे ठेवले.

photocourtesy: manoj kumar/google

‘फॅशन’ या चित्रपटातून मनोज कुमार यांनी १९५७मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी ८० वर्षाच्या वृद्धाची भूमिका साकारली होती. २०व्या वर्षी त्यांनी ८० वर्षाच्या वृद्धाची भूमिका खूप हुबेहूब साकारली. ‘हरियाली और रास्ता’, ‘वो कौन थी’, ‘हिमालय की गोद में’, ‘दो बदन’, ‘उपकार’, ‘पत्थर के सनम’, ‘नील कमल’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ आदी चित्रपटांमध्ये काम केले.

मनोज कुमार हे त्यांच्या अभिनयासोबतच चित्रपटांच्या दिग्दर्शनातही अग्रेसर होते. त्यांनी त्यांच्या अभिनय आणि दिग्दर्शनाच्या करिअरमध्ये देश भक्तीच्या चित्रपटांना नेहमीच प्राधान्य दिले. या देशभक्तीच्या सिनेमाची सुरुवात १९६५ मध्ये आलेल्या ‘शहीद’पासून झाली. या सिनेमात त्यांनी भगत सिंग यांची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे ही भूमिका समजून घेण्यासाठी भगत सिंगच्या आई विद्यावती कौर यांना भेटून अधिक माहिती घेतली होती. ‘शहीद’ सुपरहिट झाला. मनोज कुमार यांच्या प्रत्येक सिनेमातून त्यांचे देशप्रेम दिसले.

photocourtesy: manoj kumar/ google

मनोज कुमार यांच्यासाठी दिलीप कुमार आदर्श होते. दिलीप कुमारांच्या सिनेमातील नावावरूनच त्यांनी त्यांचे नाव मनोज कुमार ठेवले. इतका दिलीप कुमारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. याच दिलीप कुमारांसोबत मनोज कुमार यांना काम करण्याची संधी मिळाली, तीही दोनदा. ‘शहीद’ आणि ‘आदमी’ या चित्रपटात त्यांनी सोबत काम केले. त्यानंतर मनोज कुमार यांना ‘क्रांती’ चित्रपटाच्या निमित्ताने दिलीप कुमार यांना दिग्दर्शित करण्याची देखील संधी मिळाली.

photocouresy: manoaj kumar dilip kumar/ google

मनोज कुमार यांना ‘उपकार’ चित्रपटाची प्रेरणा भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी दिली. भगत सिंग यांच्या आयुष्यावर मनोज कुमार यांनी बनवलेला ‘शहीद’ हा चित्रपट तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी पाहिला आणि त्यांना तो खूप आवडला. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांनी मनोज कुमारांना ‘जय जवान जय किसान’ या घोषणेवर आधारित चित्रपट बनविण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतरच मनोज कुमार यांनी ‘उपकार’ हा चित्रपट बनवला. हा सिनेमा खूप गाजला आणि याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.

मनोज कुमार एका गोष्टीसाठी आजही खूप प्रसिद्ध आहे. ते म्हणजे एक हात चेहऱ्यावर ठेऊन संवाद बोलणे. हीच स्टाइल पुढे त्यांची सिग्नेचर स्टाईल बनली होती. मनोज कुमार यांनी शशी गोस्वामी यांच्याशी लग्न केले. त्यांना दोन मुलं आहेत.

जेव्हा अमिताभ यांचा पहिला चित्रपट ‘सात हिंदुस्तानी’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आणि यानंतर बिग बींचे अनेक चित्रपट सतत फ्लॉप होत होते. या काळात निराश होऊन अमिताभ यांनी सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मनोज कुमार यांनी त्यांना थांबवले आणि ‘रोटी, कपड़ा और मकान’ या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. तेव्हाच मनोज कुमार यांनी अमिताभ यांच्यामध्ये असलेली प्रतिभा ओळखली होती. मनोज कुमार यांना त्यांच्या अभूतपूर्व योगदानासाठी दादासाहेब फाळके, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार, पद्मश्री आदी बऱ्याच पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

अधिक वाचा- 
मिताली मयेकरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; सिद्धार्थ चांदेकर कमेंट करत म्हणाला, ‘लगीन करायचंय…’
खेसारी लाल यादवला होणार अटक? ‘या’ कारणामुळे कोर्टाने केले अजामीनपात्र वॉरंट जारी

हे देखील वाचा