मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एकापेक्षा एक सरस अभिनेत्री आहेत. त्यांनी अभिनयाच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली आहे. यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. पण काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी खूप कमी वेळात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. या अभिनेत्रींच्या यादीतील नावे अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहेत. या यातीक घेतले जाणारे नाव म्हणजे मिताली मयेकर होय.
मितालीने खूप कमी वेळात आपला मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. तिचे लाखो चाहते आहे. तिने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करून काही जास्त काळ लोटला नाही. अवघ्या 24 वर्षाच्या मितालीने तिची स्वत: ची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. मिताली सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरू शेअर करून चाहत्यांशी संपर्कात राहण्याच प्रयत्न करत असते.
नुकताच मितालीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो चाहत्यांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या मार्गोट रॉबी आणि रायन गॉस्लिंग स्टारर ‘बार्बी’ चित्रपट सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. त्यावर मितालीने एक भन्नाट व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ शेअर करताना मितालीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जर बार्बी भारतीय असती तर?”
मितालीने या व्हिडीओमध्ये गुलाबी रंगाच्या 6 साड्या विविध स्टाइलमध्ये परिधान केल्या आहेत. तिच्या या मराठमोळा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. तिच्या या व्हिडिओवर प्रसिद्ध अभिनेता आणि मितालीचा पती सिद्धार्थ चांदेकरने एक भन्नाट कमेंट केली आहे.
View this post on Instagram
सिद्धार्थ चांदेकरने कमेंट करताना लिहिले की, “बार्बी शोबत लगीन करायचंय…करू दे ना वं.” त्याच्या या व्हिडिओवर मितालीने ‘ओके’ असा रिप्लाय दिला आहे. त्याची हि चर्चा सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकरी कमेंट करत आहेत. (Siddharth Chandekar has commented on Mithali Mayekar video)
अधिक वाचा-
–खेसारी लाल यादवला होणार अटक? ‘या’ कारणामुळे कोर्टाने केले अजामीनपात्र वॉरंट जारी
–“आता संचालिकापद मिरवण्यात काहीही अर्थ नाही” अभिनेत्री मधुराणी गोखलेने स्पष्ट केला ‘त्या’ पोस्ट मागचा हेतू