असे म्हटले जाते की, जगात एकसारख्या दिसणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे देखील अनेक डुप्लिकेट आपल्याला पाहायला मिळतात. आता अभिनेत्री कॅटरिना कैफचे घ्याना. कॅटरिना कैफ बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक. कॅटरिनाने तिच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक असे अनेक हिट सिनेमे दिले आहेत. सौंदर्य आणि अभिनय या दोन गोष्टींच्या जोरावर कॅटरिनाने यश संपादन केले. एकीकडे कॅटरिना यशाच्या पायऱ्या चढत असताना दुसरीकडे सलमान खानच्या वीर सिनेमातून बॉलिवूडमध्ये पादर्पण झाले ते अभिनेत्री झरीन खानचे. कॅटरिना कैफची डुप्लिकेट असा टॅग तिला अगदी पहिल्या दिवसापासूनच मिळाला. मात्र या गोष्टीचा झरीनला तिच्या करिअरसाठी म्हणावा असा फायदा झाला नाही. काही वर्षांच्या करिअरमध्ये मोजक्या चित्रपटांमध्ये दिसलेल्या झरीनने अगदी दोन किंवा तीन एवढेच हिट सिनेमे दिले आहे. आज (14 मे) रोजी झरीन तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे, त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल अधिक माहिती.
झरीन खानने तिच्या आयुष्यात मोठ्या संघर्षाने आणि आर्थिक संकटांचा सामना करत चित्रपटांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. ती लहान असतानाच तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर घराची जबाबदारी तिच्यावर आली. डॉक्टर होण्याची इच्छा असणाऱ्या झरीनला परिस्थितीपुढे हात टेकत कमी वयातच काम शोधावे लागले. खूप मेहनतीने तिने एका कॉल सेंटरमध्ये काम मिळवले आणि त्यावर ती घराला हातभार लावू लागली.
एका चित्रपटाच्या सेटवर शूटिंग पाहायला आलेल्या झरीनवर सलमानची जर पडली आणि त्याने तिला ‘वीर’ सिनेमाची ऑफर दिली. 2010साली आलेल्या या सिनेमाने काही खास कमाई केली नसली तरी झरीनला एक अभिनेत्री नक्कीच बनवले. बॉलिवूडमध्ये आल्यापासूनच तिला कॅटरिनाची डुप्लिकेट म्हणून एक नवी ओळख मिळाली.
वीर सिनेमानंतर झरीन हाउसफुल 2, हेट स्टोरी 2, वजह तुम हो, अक्सर 2 आणि1921 आदी चित्रपटांमध्ये दिसली, मात्र अनेक प्रयत्नांनी देखील हे सिनेमे हिट होऊ शकले नाही. तिच्या कॅटरिनासोबत होणाऱ्या तुलनेबाबत झरीनने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “अभिनेत्री होण्याचे मी काही ठरवले नव्हते. मी कधीच स्वतःला या क्षेत्रात पाहिले नव्हते. मी स्वतः खूप स्ट्रॉंग आहे. माझी कोणी इतरांसोबत तुलना केल्याचे मला आवडत नाही, आणि त्याची गरज नाही. मला वाटते की लोकांना संधीच मिळाली नाही मला ओळखण्याची माझ्यातली प्रतिभा जाणून घेण्याची.”
एका मुलाखतीमध्ये झरीनने तिच्या अयशस्वी करिअरचे खापर कॅटरिना कैफवर फोडले होते. तिने मान्य केले होते की, कॅटरिना सारखे दिसत असल्यामुळे तिच्या करिअरवर याचा वाईट परिणाम झाला. तिने हे देखील सांगितले होते की, कोणताही निर्माता एखाद्या कलाकाराच्या डुप्लिकेटसोबत काम करण्यास इच्छुक नसतो.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Mother’s Day 2023 | सिने जगतातील ‘या’ अभिनेत्री परंपरेला छेद देत, नावापुढे लावतात आईचे आडनाव
प्रतिभेच्या जोरावर पॅन इंडिया ओळख मिळवणाऱ्या सचिन खेडेकर यांनी केले दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये मोठे काम