×

प्रतिभेच्या जोरावर पॅन इंडिया ओळख मिळवणाऱ्या सचिन खेडेकर यांनी केले दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये मोठे काम

अभिनेते सचिन खेडेकर हे मनोरंजनविश्वातील मोठे नाव. आपल्या दमदार अभिनयाच्या आणि प्रतिभेच्या जोरावर त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. केवळ मराठीच नाही तर हिंदी तेलगू, तामिळ, मल्याळम, गुजराती आदी जवळपास सर्वच भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तर सर्वच भाषांमध्ये त्यांनी काम केले. दाक्षिणात्य सिनेसृष्टीमधे त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम करत मोठी ओळख निर्माण केली.

हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करत असलेल्या सचिन खेडेकर यांनी २००५ साली मल्याळम सिनेमात काम करण्यास सुरुवात केली. मल्याळम भाषेतील त्यांचा पहिला सिनेमा ‘पोलीस’ प्रदर्शित झाला. या सिनेमात त्यांनी रेजी एलन ही भूमिका त्यांनी साकारली. यानंतर त्यांनी लुसिफर आणि कादुवा चित्रपटांमधून त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप लोकांवर पाडली.

सचिन मराठी आणि हिंदीनंतर सर्वात जास्त तामिळ भाषेत सक्रिय होते. त्यांनी या क्षेत्रात खूप काम केले. या चित्रपटांमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. तामिळ सिनेमात त्यांनी ‘युवारम नालम’ या चित्रपटातून पदार्पण केले. या सिनेमात त्यांनी डॉ. बालू ही भूमिका साकारली. विक्रम कुमार दिग्दर्शित या सिनेमात त्यांनी लोकांकडून खूपच वाहवा मिळवली. त्यानंतर त्यांनी एकापेक्षा एक अशा तामिळ चित्रपटांमध्ये काम केले. देवा थिरुमगल, मातरान आदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकेचे तुफान कौतुक झाले. पुढे ते २०२१ साली ‘कोदियिल उरुवान’ सिनेमात दिसले. या सिनेमात ते मुख्यमंत्र्यांच्या सिनेमात झळकले.

तेलगू भाषेत देखील त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. या इंडस्ट्रीमध्ये देखील त्यांना खूप प्रेम झाले. सचिन खेडेकर यांनी ‘मल्ली-मल्ली’ या सिनेमातून तेलगू क्षेत्रात पदार्पण केले. चित्रपटात त्यांनी ‘सत्या’ ही भूमिका केली. या सिनेमातून त्यांनी तेलगू प्रेक्षकांवर देखील छाप सोडली. जनता गॅरेज या जुनियर एनटीआरच्या चित्रपटात देखील त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी नेनु लोकल, लवर, एन.टी.आर: महानायकुडु, यात्रा, एन.टी.आर: कथानायकुडु आदी चित्रपटांमध्ये काम केले.

मराठीमध्ये तर सचिन खेडेकर यांनी अतिशय उत्तमोत्तम चित्रपट केले. हिंदीमध्ये त्यांनी ‘अर्जुन पंडित’, ‘दाग- द फायर’, ‘अस्तित्व’, ‘हम प्यार तुम्ही से कर बैठे’, ‘हथियार’, ‘मुझसे दोस्ती करोगे’, ’23 मार्च 1931 शहीद’, ‘तेरे नाम’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. सचिन खेडेकर यांना त्याच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post