Sunday, August 3, 2025
Home अन्य अपरा मेहतांनी आपल्या अभिनयाने जिंकली चाहत्यांची मने; तर एकाच व्यक्तीशी थाटला होता दोनदा संसार

अपरा मेहतांनी आपल्या अभिनयाने जिंकली चाहत्यांची मने; तर एकाच व्यक्तीशी थाटला होता दोनदा संसार

 

अपरा मेहता यांचा जन्म १३ ऑगस्ट, १९६० साली गुजरातच्या जामनगरमध्ये झाला. मोठे झाल्यानंतर त्यांनी अभिनयाची वाट धरली आणि अभिनय करायला सुरुवात केली. मालिकांमधून अभिनय करत त्यांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण केली. २००० साली आलेल्या एकता कपूरच्या ‘क्योकिं सास भी कभी बहू थी’ या मालिकेत त्यांनी तुलसी विराणी उर्फ स्मृती इराणींच्या सासूची सावित्री विराणीची भूमिका साकारली आणि त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली. आजही अनेक लोकं त्यांना सावित्री विराणी या नावानेच ओळखतात. अपरा यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांना त्यांच्या व्यायसायिक आयुष्यात जेवढे यश, प्रसिद्धी मिळाली, तेवढेच खडतर त्यांचे वैयक्तिक आयुष्य होते. (Birthday special kyunki saas bhi kabhi bahu thi fame apara mehta)

अपरा मेहता यांनी अभिनेते दर्शन जरीवाला यांच्यासोबत १९८० साली लग्न केले. त्यावेळी त्या १८, तर दर्शन २१ वर्षांचे होते. दर्शन जरीवाला देखील मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना दिसतात. त्यांनी रणबीर कपूरच्या ‘अजब प्रेम की गजब कहाणी’ सिनेमात प्रेमच्या म्हणजेच रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली होती, तर दर्शन जरीवाला यांच्यासोबत लग्न केल्यानंतर पुढच्यावर्षी १९८१ साली त्यांनी पुन्हा एकमेकांशी लग्न केले. कारण त्यांच्या दोघांचंही घरच्यांची इच्छा होती की, अपरा आणि दर्शन यांचे धुमधडाक्यात लग्न व्हावे.

अपरा आणि दर्शन यांचे लग्न झाल्यानंतर जवळपास २३ वर्षांनी म्हणजेच २००४ मध्ये ते वेगळे झाले. वेगळे होऊनही त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला नाही. दोघांचे विचार न जुळल्यामुळे दोघांनी एक विचाराने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. इतर कलाकारांच्या जोड्यांसारखे ते आजही चांगले मित्र आहे. एकमेकांच्या आयुष्याचा आणि विचारांचा सन्मान करणारे अपरा आणि दर्शन आजही संकटात मदतीसाठी धावून जातात. या दोघांना कुशाली नावाची एक मुलगी असून ती अपरा यांच्याजवळ राहते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-या वीकेंडलाही ‘सुपर डान्सर’मध्ये शिल्पा शेट्टी गैरहजर; पण जॅकी अन् संगीताची जोडी लावणार ‘चार चाँद’

-आर माधवनसोबत विमानात पहिल्यांदाच घडले ‘असे’ काही; अभिनेत्याचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

-युरोप फिरून ५ महिन्यानंतर मायदेशी परतली परिणीती चोप्रा; म्हणाली, ‘आपल्या घरासारखे…’

हे देखील वाचा