‘तुम मिले’, ‘कुन फाया कुन’ यांसारखी सुपरहिट गाणी बॉलिवूडला देणारा गायक म्हणजे जावेद अली. त्याने हिंदी चित्रपटासोबत तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, बंगाली आणि मराठी भाषेत देखील गाणी गायली आहेत. बुधवारी (05 जुलै) जावेद अली आपला 40वा वाढदिवस साजरा आहे. जावेद अलीचा जन्म 5 जुलै, 1982 मध्ये दिल्ली येथे झाला होता. त्याचे वडील उस्ताद हमीद एक कव्वाली गायक होते. अशात त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही गोष्टी.
जावेद अलीने 2000 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. गोविंदाचा चित्रपट ‘बेटी नंबर 1’ मध्ये त्याने पहिल्यांदा गाणे गायले होते. त्याच्या अनेक चाहत्यांना ही गोष्ट माहीत देखील नसेल की, जावेद अलीचे खरे नाव जावेद हुसैन होते. त्याने त्याचे नाव बदलण्यामागे एक खास कारण आहे. जावेदला आज संपूर्ण देशात ओळखले जाते. त्याने त्याचे गुरू गुलाम अली यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्याचे नाव जावेद अली असे ठेवले.
जावेद अलीच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, त्याला बॉलिवूडमध्ये पार्श्वगायक बनायचे नव्हते. खरं तर, त्याला त्याच्या गुरूप्रमाणे गझल गायक बनायचे होते, पण तो आपले हे स्वप्न पूर्ण करण्यात अपयशी ठरला.
जावेद अलीने अनेक हिंदी चित्रपटात गाणी गायली आहेत. परंतु त्याला 2007मध्ये ‘नकाब’ या चित्रपटातील ‘एक दिन तेरी राहो में’ या गाण्याने अफाट यश आणि खरी ओळख मिळाली. त्यानंतर त्याने ऋतिक रोशन आणि ऐश्वर्या रायच्या ‘जोधा अकबर’ या चित्रपटातील ‘कहने को जश्न बहारा है’ हे गाणे गायले. या दोन गाण्यांनी त्याला बॉलिवूडमध्ये चांगलीच ओळख मिळाली.
जावेद अलीने त्याच्या करिअरची सुरुवात झी टीव्हीवरील सिंगिंग बेस्ट रियॅलिटी शो ‘सारेगामापा लिटिल चॅम्प’चे परीक्षक म्हणून केली. त्याने रणबीर कपूरच्या ‘रॉकस्टार’ चित्रपटातील ‘कुन फाया कुन’, ‘नगाडा नगाडा’, ‘तू जो मिला’, ‘दीवाना कर रहा है’ यांसारखी अनेक सुपरहिट गाणी बॉलिवूडला दिली आहेत.
याव्यतिरिक्त त्याला आपल्या गायनासाठी आणि परीक्षणासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात ‘मिर्ची म्युझिक अवॉर्ड फॉर क्रिटिक चॉईस’, ‘आयआयएफए अवॉर्ड फॉर बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर’, ‘झी रिश्ते अवॉर्ड फॉर फेव्हरेट जज’ यांसारख्या अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.(birthday special lets know the career journey of javed ali)
एकता कपूरने फाडला हाेता स्मृती इराणींचा कॉन्ट्रॅक्ट; वर्षांनंतर केला खुलासा, म्हणाली…
‘या’ कारणास्तव समंथाने सिनेसृष्टीतून घेतला ब्रेक, निर्मात्यांचा अॅडव्हान्सही केला परत