Monday, December 9, 2024
Home मराठी बापरे! ‘तो लग्न करण्यासाठी पैशाची थैली घेवून आला होता…’, रिंकूच्या प्रेमात सैराट झालेल्या चाहत्याचा किस्सा

बापरे! ‘तो लग्न करण्यासाठी पैशाची थैली घेवून आला होता…’, रिंकूच्या प्रेमात सैराट झालेल्या चाहत्याचा किस्सा

आपल्या पहिल्याच सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्रात ओळख मिळवणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. तिने तिच्या पहिल्याच ‘सैराट’ सिनेमातून लोकांना अक्षरशः वेड लावले. अभिनय, अंदाज, संवाद आदी अनेक कारणांमुळे तिने तिची ओळख निर्माण केली. पहिल्याच सिनेमाने तिला न भूतो न भविष्यती अशी ओळख दिली. सैराट नंतर तिचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. तिला असंख्य फॅन्स देखील मिळाले. या फॅन्सचे अनेक किस्से तिने अनुभवले. असाच एक किस्सा कमालीचा गाजला. तो तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होता. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याबद्दल.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सुबोध भावेचा बस बाई बस हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आहे. अलिकडेच या कार्यक्रमात सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूने सहभाग घेतला होता. यावेळी रिंकूने सैराट चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानचे अनेक भन्नाट किस्से सांगितले. जे ऐकून सगळेच थक्क झाले. यामध्ये अभिनेत्रीने एका चाहत्याचाही किस्सा सांगितला. यामध्ये तिने सांगितले की हा चाहता तिच्याशी लग्न करण्याचा हट्ट करत होता.

हा किस्सा सांगताना ती म्हणाली की, “आम्ही अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांना जातो. यावेळी अनेकदा चाहते भेटत असतात. एका कार्यक्रमात मी अशाच एका चाहत्याला हात दाखवला. माझ्या लक्षातही नव्हत तो कोण होता. त्यानंतर तो थेट माझ्या घरी आला. मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे म्हणू लागला. वला. माझ्या लक्षातही नव्हतं तो कोण होता. एके दिवशी अचानक तो घरी आला आणि माझ्या आई-बाबांना म्हणाला मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. तिने माझ्या डोळ्यात बघितलं आहे. ती रुक्मिणीचा अवतार आहे. मागच्या जन्मी मीही देव होतो. तर या जन्मी तुम्ही आमचं लग्न लावून द्या असेही तो म्हणाला.”

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

रिंकूने पुढे सांगितले की “यावरच न थांबता त्यानंतर तो अनेकदा माझ्या घरी यायचा. एकदा मी परिक्षेसाठी गेले होते. माझा पेपर संपल्यानंतर मी बाहेर आले. तेव्हा तो माझ्यासमोर पैशांची थैली घेऊन उभा होता. त्याने मला आणि माझ्या कुटुंबियांना खूप त्रास दिला. शेवटी आम्हाला पोलिसांत तक्रार करावी लागली”. दरम्यान रिंकू राजगुरू अलिकडेच रंग आठवा प्रेमाचा या चित्रपटात झळकली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-

लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!

वयाच्या १५ व्या वर्षीच ‘आर्ची’ बनली होती स्टार; बारावीचे पेपर द्यायला बॉडीगार्डलाही न्यावे लागायचे सोबत

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा