आज हिंदी सिनेसृष्टीतील जेष्ठ कलाकार संजय खान यांचा वाढदिवस. १९६४ साली त्यानी ‘हकीकत’ या सिनेमातून मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली. हा चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. संजय खान हे एक आभिनेत्यासोबतच उत्तम चित्रपट निर्माते देखील होते. संजय यांनी त्याच्या करियरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. संजय यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच त्याचे पर्सनल आयुष्य देखील खूप गाजले. संजय आणि झीनत अमान यांच्या भांडणाचा किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
झीनत अमान ह्या त्यावेळच्या यशस्वी, सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक हिट सिनेमात काम केले. झीनत आणि संजय हे ‘अब्दुल्लाह’ चित्रपटाची शूटिंग करत होते. या शूटिंग दरम्यान झीनत आणि संजय हे जवळ आले आणि त्यांच्या अफेयरच्या बातम्या यायला लागल्या. एकदा झीनत त्याच्या दुसऱ्या एका सिनेमाचे लोणावळ्यात चित्रीकरण करत असताना, संजय यांनी त्यांना फोन केला आणि सांगितले की, ” तुम्ही सर्व शूटिंग सोडून ताबडतोब मुंबईत परत या. ‘अब्दुलाह’ चित्रपटाच्या एका गाण्याचा काही भाग पुन्हा चित्रित करायचा आहे. त्यावर झीनत यांनी त्यांना सांगितले की मी माझ्या डेट्स आधीच दुसऱ्या चित्रपटाला दिल्या आहेत. त्यामुळे मी शूटिंग मधेच सोडून येऊ शकत नाही. याचा राग येऊन संजय यांनी झीनत यांच्या चित्रपटाच्या निर्मात्यांसोबत अवैध संबंध असल्याचे आरोप केले.
यांमुळे झीनत खूप नाराज झाल्या. त्या डेट्स बद्दल बोलण्यासाठी संजय यांच्या घरी मुंबईला आल्या, तेव्हा त्यांना संजय हॉटेल ताज मध्ये पार्टी करत असल्याचे समजले. त्या त्वरित तिकडे गेल्या. झीनत यांना अचानक त्या पार्टीत बघून सर्वानाच आश्चर्य वाटले. संपूर्ण पार्टी शांत झाली. झीनत यांना तिथे पाहून संजय यांच्या पत्नी जरीन खूप नाराज झाल्या. संजय यांनी झीनत यांना एका रूममध्ये नेले, झीनत यांना कोणतीही कल्पना देखील नव्हती की आता त्यांच्यासोबत काय होणार आहे, तेवढ्यात संजय यांनी त्यांना मारायला सुरुवात केली.
संजय झीनत यांना खूप मारत होते. तेव्हा संजय यांच्या पत्नी देखील तिथे आल्या. त्यांनी सुद्धा झीनत यांना खूप मारले. अक्षरशः झीनत यांच्या शरीरातून रक्त यायला लागले. पार्टीमध्ये आलेल्या सर्वानाच काय होत आहे हे समजले होते मात्र कोणीच झीनत यांना मदत केली नाही. अखेर तिथल्या एका कर्मचाऱ्याने त्यांना मदत करत संजय यांच्यापासून वाचवले.
या गोष्टीतून बाहेर येण्यासाठी झीनत यांना आठ वर्ष लागले. एवढे घडूनही झीनत यांनी संजय यांच्या विरोधात तक्रार केली नाही.