बॉलिवूडमध्ये सनी लिओनीपासून ते नोरा फतेहीपर्यंत अनेक हॉट अभिनेत्रींचा समावेश आहे. ते आपल्या अदांमुळे चाहत्यांमध्ये जबरदस्त प्रसिद्ध आहेत. या अभिनेत्रींपैकीच एक म्हणजे बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री ‘उर्वशी रौतेला’ होय. ती नेहमीच आपल्या हटके अंदाजामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती भलतीच सक्रिय असते. तसेच आपल्या चाहत्यांसाठी भन्नाट फोटो शेअर करत असते, जे काही क्षणातच व्हायरल होतात. उर्वशीवर बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक फिदा होता. तो तिच्या प्रेमात इतका बुडला होता की, तिच्यासोबत लग्न करण्याचाही विचार त्याने केला होता. परंतु काही कारणास्तव ते होऊ शकले नाही. आज (२५ फेब्रुवारी) ती आपला २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने आपण या लेखातून तिच्या आयुष्यातील अशाच भन्नाट गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…
वयाच्या १७ व्या वर्षी हा पुरस्कार केला नावावर
आपल्या सुंदरतेमुळे उर्वशीने अनेक पुरस्कार नावावर केले आहेत. तिने आपल्या वयाच्या केवळ १७ व्या वर्षी ‘मिस युनिव्हर्स’चा किताब नावावर केला होता. त्यानंतर तिने सन २०११ मध्ये ‘मिस टुरिझम क्वीन ऑफ द ईअर’चा किताब पटकावला होता.
मिका सिंग झाला होता फिदा
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंग, ज्याने चाहत्यांच्या मनावर आपल्या आवाजाने जादू केली आहे. तो अभिनेत्री उर्वशीवर फिदा झाला होता. इतकेच नव्हे, तर त्याने आपल्या चाहत्यांना हा विश्वासही दाखवला होता की, तो लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. एका मुलाखतीदरम्यान जेव्हा मिकाला लग्नाबद्दल विचारले होते की, तो कोणासोबत लग्न करणार आहे?, यावर मिकाने म्हटले होते की, “मला ‘सनम रे’ चित्रपटात झळकलेली अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत लग्न करायचे आहे.”
खरं तर उर्वशी आणि मिका सिंग यांच्यात तब्बल १७ वर्षांचे अंतर आहे. तिच्या लग्नाबद्दल उर्वशीला विचारले असता, तिने म्हटले होते की, “माझ्या चुलत बहिणीचे लग्न झाल्यानंतर मी लग्न करेल. मला सध्या माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. वेळ आल्यानंतर मी स्वत: तुम्हा सर्वांना सांगेल.” तरीही, त्यानंतर या बातम्यांना अफवा असल्याचे म्हटले होते.
उर्वशी रौतेलाच्या चित्रपट कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर तिने ऍक्शन आणि रोमांसवर आधारित ‘सिंग साहब द ग्रेट’ चित्रपटातून अभिनय क्षेत्राची सुरुवात केली होती. या चित्रपटात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर तिने बॉलिवूड रॅपर हनी सिंगचा व्हिडिओ अल्बम ‘लव डोस’मध्येही दिसली होती. यानंतर तिने ‘सनम रे’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘हेट स्टोरी ४’ आणि ‘पागलपंती’ यांसारख्या चित्रपटातही काम केले आहे.
सन २०२० मध्ये उर्वशी रौतेलाचा ‘व्हर्जिन भानुप्रिया’ हा चित्रपट रिलीझ झाला आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-