Saturday, August 2, 2025
Home अन्य सृष्टी रोडे घेणार होती मनीष नागदेवसह सात फेरे, मग ‘बिग बॉस’मध्ये असं काय झालं, ज्यामुळं तुटलं हे नातं?

सृष्टी रोडे घेणार होती मनीष नागदेवसह सात फेरे, मग ‘बिग बॉस’मध्ये असं काय झालं, ज्यामुळं तुटलं हे नातं?

‘छोटी बहू’ मालिकेमधून अभिनेत्री सृष्टी रोडेने चाहत्यांच्या मनावर राज्य केले. अभिनेत्री तिच्या प्रेम संबंधांमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. तसेच आपल्या चाहत्यांना खुश ठेवण्यासाठी ती स्वतः देखील वेगवगळ्या माध्यमातून आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करते. सृष्टी शुक्रवारी (२४ सप्टेंबर) तिचा वाढदिवस साजरा करते. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ तिचा जीवनप्रवास आणि वादग्रस्त प्रेम कहाणी.

सृष्टी रोडेचा जन्म २४ सप्टेंबर १९९१ रोजी मुंबईमध्ये झाला. तिचे वडील टोनी रोडे हे ज्येष्ठ सिनेमटोग्राफर आहेत आणि आई साधना गृहिणी आहे. अभिनेत्रीने मुंबईतील सेंट लुईस कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर तिने मिठीबाई महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले. तिला लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती. (Birthday special srushti rode was about to marry Manish naggdev but their relationship broken up in Bigg Boss because of one biggest reason)

अवघे १००० रुपये होती पहिली कमाई
तिने साल २००७ मध्ये बालाजी टेलिफिल्म्सच्या ‘कुछ इस तरह’ या मालिकेमधून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यावेळी तिला अवघे १००० रुपये मानधन मिळाल्याचे तिने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते. त्यानंतर तिने जाहिरातींसाठी ऑडिशन देण्यास सुरुवात केली. हिंदुस्थान युनिलिव्हरच्या फेअर ऍंड लव्हलीच्या जाहिरातीमधून तिला विशेष ओळख मिळाली.

साल २०१० मध्ये ‘ये इश्क हाये’ मध्ये तिने अभिनय केला. पुढच्याच वर्षी तिने झी टीव्ही च्या ‘छोटी बहू’साठी साइन अप केले. या मालिकेमधून ती घराघरात पोहचली. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने ‘इश्कबाज’मध्ये देखील अभिनय केला. तसेच ‘बिग बॉस’च्या १२ व्या पर्वामध्ये देखील ती सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घरातून ७० व्या दिवशी तिला घराबाहेर काढण्यात आले. त्यानंतर तिच्या आयुष्याला एक वेगळेच वळण लागले. तिने स्वतः तिच्या जीवनात मोठे बदल केले.

मनीष नागदेवसोबत तोडले नाते
अभिनेत्रीने ‘बिग बॉस’च्या घरामध्ये प्रवेश करण्याआधीच मनीष नागदेवसोबत साखरपुडा केला होता. शोमधून बाहेर आल्यांनतर ते दोघे विवाह करणार होते. परंतु काय झाले कुणास ठाऊक! ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आणि पुढच्या ७ दिवसांमध्येच तिने मनीषसोबत असलेले सर्व संबंध मोडले. या गोष्टीचा तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अनेक दिवसांपासून त्या दोघांचे चाहते त्यांच्या लग्नाची वाट बघत होते. परंतु सृष्टीने असे केल्याने सर्वच जण निराश झाले. त्यावेळी दोघांनी देखील या विषयी काहीही प्रतिक्रिया देणे टाळले होते.

मनीष नागदेवने व्यक्त केला राग
ब्रेकअप केल्याने मनीष फार दुःखी झाला होता. त्याने ६ महिन्यानंतर त्याच्या मनातील भावना इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या. त्याने ६ पानांची मोठी पोस्ट शेअर केली होती. त्याला झालेला त्रास, सृष्टीने त्याच्याबरोबर केलेला व्यवहार याविषयी लिहीत त्याने तिच्यावर अनेक आरोप देखील केले होते. त्याने यामध्ये असे लिहिले होते की, “जे व्हायचं होत, ते झालं. सृष्टीने मला फसवलं आहे. ती माझ्या भावनांशी खेळली. तिने स्वतःसाठी माझा फक्त वापर करून घेतला.”

रोहित सुचांतीसोबत गात होती प्रेमाचे गीत
सृष्टी आणि रोहित हे ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र आले. ते दोघे एकमेकांसोबत खूप वेळ घालवायचे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर देखील अभिनेत्री रोहितला डेट करत होती. अनेकांनी रोहितला ५ वर्ष मोठ्या मुलीला का डेट करतो असे विचारले होते. त्यावेळी त्यांना उत्तर देत त्याने सांगितले होते की, “मला सृष्टी खूप आवडते आणि तिचे वय आम्हा दोघांमध्ये फूट नाही पाडू शकत.” या दोघांना अनेक वेळा एकत्र डेटवर पाहिले गेले होते. परंतु सृष्टीचे हे नाते देखील फार काळ नाही टिकले. वर्षभरातच त्या दोघांमध्ये मतभेद होऊ लागले आणि ते वेगळे झाले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Bigger Boss 15: शोमध्ये सहभागी होणाऱ्या ‘या’ पाच स्पर्धकांच्या नावावर शिक्कामोर्तब

-अनोख्या फॅशन सेन्समुळे पुन्हा चर्चेत आली उर्फी जावेद, व्हायरल फोटोवर ट्रोलर्सचा निशाणा

-जेव्हा अक्षय कुमारवर झाला होता जीवघेणा हल्ला; आवाज जरी केला, तर झाडल्या गेल्या असत्या गोळ्या

हे देखील वाचा