बॉलिवूडमध्ये कॅरेक्टर रोल करणारे अनेक कलाकार आहेत. प्रत्येक कलाकाराने त्याची एक वेगळी छाप प्रेक्षकांवर आणि समीक्षकांवर सोडली. मात्र यासर्वांमधे आशुतोष राणा हे नाव जरा वरचढच ठरते. आशुतोष राणा यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाने त्यांचा एक वेगळाच ठसा या इंडस्ट्रीवर आणि प्रेक्षकांवर उमटवला आहे. आशुतोष राणा हे नाव उच्चरले की, डोळ्यासमोरून अनेक प्रभावी आणि जिवंत अशा त्यांच्या खलनायकी भूमिका सर्रकन जातात. भारदस्त नाव आणि त्या नावाला साजेसे असे उत्कृष्ट काम करणारे आशुतोष राणा आज (10 नोव्हेंबर) रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. आशुतोष राणा म्हणजे एक हरहुन्नरी असे व्यक्तिमत्व. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या. प्रचंड वाचन असणाऱ्या आशुतोष राणा यांची हिंदी भाषेवरील पकड भल्याभल्याना आश्चर्य चकित करते.
आशुतोष राणा यांनी मध्यप्रदेशमधील अतिशय छोट्या गावातून येत त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचे भक्कम स्थान निर्माण केले. लहानपणापासूनच आशुतोष अभिनय करण्यासाठी उत्सुक असायचे. लहान असताना विविध गल्ली बोळ्यांमध्ये जाऊन ते नाटक करायचे. त्यांनी दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या रामलीलेत त्यांनी रावणाची भूमिका साकारत लोकांचे मनोरंजन केले. त्यांच्या स्वप्नात देखील कधी आले नव्हते की, ते बॉलिवूडमध्ये काम करतील. मध्यप्रदेश ते बॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या आशुतोष यांच्याबद्दल आज काही माहित नसलेल्या गोष्टी आणि त्यांच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊया.
आशुतोष राणा यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1967 साली मध्यप्रदेशमधील गदरवारा येथे झाला. जेव्हा आशुतोष ११ वी ची परीक्षा उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांचा निकाल गाडीमध्ये ठेऊन संपूर्ण गावात फिरवण्यात आला होता. पुढे त्यांनी एल एल बी चे शिक्षण घेत वकिली करण्याचे ठरवले. तेव्हा त्यांच्या शिक्षकांनी त्यांना अभिनयामध्ये करिअर करण्याचा सल्ला दिला. त्यांनतर आशुतोष यांनी दिल्लीच्या एनएसडी म्हणजेच नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला.
आशुतोष राणा यांनी ‘स्वाभिमान’ या मालिकेतून त्यांच्या करिअरची सुरुवात केली. या मालिकेत त्यांनी एका गुंडाची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी फर्ज, साजिश, कभी कभी, वारिस आदी अनेक टीव्ही मालिका केल्या. त्यांचा उत्तम अभिनय पाहून त्यांना चित्रपटांच्या ऑफर मिळायला लागल्या. त्यांनी तमन्ना, कृष्णा अर्जुन, दुश्मन, गुलाम आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले मात्र त्यांना खरी ओळख संघर्ष सिनेमाने त्यांना खरी ओळख दिली. या सिनेमानंतर त्यांनी बादल, राज, अनर्थ, हासिल, कलयुग, जिला गाजियाबाद, शोरगुल, सोनचिड़िया, वॉर, पगलैट आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. हिंदीसोबतच त्यांनी बंगाली, मराठी, तामिळ, तेलगू आदी अनेक भाषांमध्ये देखील काम केले.
एका मीडिया रिपोर्टनुसार आशुतोष राणा यांचे नेटवर्थ जवळपास 46 कोटी एवढी आहे. ते अनेक मोठ्या ब्रँडचे एंडोर्समेंट करतात. मुंबईतील घरासोबतच त्यांच्याकडे पजेरो, BMW X1 आदी आलिशान गाड्या देखील आहेत.
आशुतोष राणा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्याशी लग्न केले. या दोघांना शौर्यमन आणि सत्येंद्र ही दोन मुलं आहेत.(birthday special story ashutosh rana know his networth ashutosh rana journey)
हेही वाचा-
–दिवाळी म्हटल्यावर कार्तिक आर्यन बघत असतो ‘या’ खास क्षणाची वाट, बालपणीच्या दिवसांचा केला खुलासा
–‘मोहब्बतें’ ते ‘कभी खुशी कभी गम’…असे बॉलिवूड सिनेमे ज्यांनी आपल्याला दिवाळीचे अविस्मरणीय दृश्य दिले!