Thursday, April 18, 2024

‘मोहब्बतें’ ते ‘कभी खुशी कभी गम’…असे बॉलिवूड सिनेमे ज्यांनी आपल्याला दिवाळीचे अविस्मरणीय दृश्य दिले!

दिवाळी आली की संपूर्ण भारत त्या उत्सवात रंगून जातो. सगळ्या बाजारपेठा सर्व दिवे, फराळ, मिठाई आणि सजावटांनी सजलेल्या असतात. दिवाळी हा एकमेव उत्सव आहे जो जगभर प्रत्येक भारतीय आनंद आणि उत्साहाने साजरा करतो. साहजिक दिवाळी आली की बॉलिवूडही त्यात मागे नाही. बॉलिवूडने आपल्याला दिवाळी विशेष अनेक गाजलेले क्षण दिले आहेत जे चित्रपट चाहते कायम लक्षात ठेवतील.

१९६५ च्या दशकापासून देव आनंद अभिनित रोमँटिक सिनेमा ‘गाईड’ ते धर्मा प्रॉडक्शनचा ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटांनी काही हृदयस्पर्शी दिवाळी दृश्य दिले आहेत.

या आणि अश्या अजून काही चित्रपटांवर आज नजर टाकुयात.

कभी खुशी कभी गम (२००१)
शाहरुख खान आणि जया बच्चन यांच्यातील ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील दिवाळीचे दृश्य कदाचित कोणालाही माहिती नाही असे नसेल. दिवाळीनिमित्त राहुल रायचंद (शाहरुख) घरी पोचतो, आणि त्याची आई (जया बच्चन) तिला माहिती नसतानाही त्याच्या आगमनाची जाणीव होते.

वास्तव (१९९९)
महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात संजय दत्त एका गँगस्टरची भूमिकेत दिसला. दिवाळीच्या वेळी तो आपल्या कुटूंबाला भेटण्यासाठी लपलेला संजय बाहेर आला होता. रीमा लागू यांच्यासोबत असलेल्या दृश्यात संजय दत्तने रेखाटलेला रघु आईला आपल्या परिधान केलेल्या सोन्याचे मूल्य समजावून सांगतो आणि सर्वांचा आवडता डायलॉग “ये देख पच्चास तोला”! हे दृश्य आजदेखील अनेक लोकांना अगदी मुखोदगत आहे.

 

चाची ४२०
कमल हसनचा चाची ४२० हा सिनेमा रॉबी विल्यमच्या मिसेस डाऊटफायरवर आधारित आहे. जेव्हा चाची दुर्गाप्रसाद भारद्वाज यांच्या घरी भारतीची मदतनीस म्हणून नोकरीसाठी जाते, तेव्हा ती भारतीला फाटकाच्या दुर्घटने पासून वाचवते आणि तिला ती नोकरी मिळते. हे दृश्य देखील अनेकांना तेव्हा प्रचंड आवडलं होतं.

मोहब्बते (२०००)
एसआरकेचा २००० मधील आणखी एक हिट चित्रपट ‘मोहब्बतें’ मध्येही ‘पैरो में बंधन है’ हे दिवाळी गीत होते. प्रचंड उत्साही आणि खूप मोठी स्टार कास्ट असलेले हे दिवाळी गाणे या उत्सवाचे महत्व दाखवणारे होते.

गाईड (१९६५)
विजय आनंद यांचा हा चित्रपट रोझी (वहीदा रहमान) यांचा देखील आहे जितका तो राजू (देव आनंद) यांचा आहे. दोघांनाही ठेवावयाचे रहस्य असून ती राखण्यासाठी खोटी व्यक्तिरेखा उभी करणे असा हा चित्रपट. पण, ‘पिया तोसे नैना लगे रे’ मध्ये रोझी सर्व गोष्टी बाजूला ठेऊन अपले सर्व ढोंग सोडण्याचा निर्णय घेते आणि अतिशय सुंदर नृत्यविष्कार दाखवते.

 

हम आपके हैं कौन (१९९४)
सलमान खान आणि माधुरी दीक्षित अभिनित चित्रपट ‘हम आपके है कौन’ हा सिनेमाश्रुष्टीतील एक अजरामर कलाकृती आहे. चित्रपटातील एका गाण्यात रेणुका शाहणे एका लहान मुलाला जन्म देते आणि त्याच्या आगमनाच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब आनंदाने गाण्यात उत्सव आणि आनंद साजरा करते.

स्वदेस (२००४)
एसआरकेचा आणखी एक चित्रपट ‘स्वदेस’, यात देखील दिवाळीचे दृश्य आहे पण ‘कभी खुशी कभी गम’ सारखे आनंददायक नाही. दिवाळीच्या शुभ दिवशी जेव्हा दादाजी यांचे निधन होते तेव्हा अश्या या आनंदाच्या दिवशी अशी वेळ येते हे बघून अनेकांचे डोळे आजही हा चित्रपट बघताना पाणावतात.

 

आधिक वाचा-
शिल्पा शेट्टीचा ‘किलर’ अंदाज, पाहा घायाळ करणाऱ्या अदा
दिवाळी म्हटल्यावर कार्तिक आर्यन बघत असतो ‘या’ खास क्षणाची वाट, बालपणीच्या दिवसांचा केला खुलासा

हे देखील वाचा